राजकुमार रावच्या 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Rajkummar Rao : राजकुमार राव हा सध्या त्याच्या 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 7, 2024, 03:06 PM IST
राजकुमार रावच्या 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ  title=
(Photo Credit : Social Media)

Rajkummar Rao : 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' या दोन सुपरहिट चित्रपटांसह राजकुमार रावने 2024 हे त्याचे वर्ष असल्याचे सिद्ध केले आहे. दोन्ही चित्रपट अवघ्या दोन-तीन आठवड्यांच्या कालावधीत थिएटरमध्ये दाखल झाले असले तरी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. ‘श्रीकांत’ हा  बायोपिक ड्रामा लवकरच 45 कोटी रुपये पार करेल अशी अपेक्षा आहे तर दुसरीकडे मिस्टर अँड मिसेस माही’ हा राजकुमार रावचा 6.85 कोटी रुपयांसह पहिल्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट ओपनिंग चित्रपट ठरला आहे. ज्यानं 6.82 कोटी रुपयांसह ओपनिंग केलेल्या ‘स्त्री’ला मागे टाकले आहे. 'श्रीकांत'च्या यशामुळे राजकुमार रावला त्याच्या अभिनयासाठी अनेक समीक्षक पुरस्कार मिळतील याची खात्री असली तरी 'मिस्टर अँड मिसेस माही'ला मिळालेला प्रतिसाद हे सिद्ध करतो की राजकुमार हा उत्तम अभिनेता आहे.

‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ च्या यशानं राजकुमार रावनं तो केवळ स्वतःचा प्रतिस्पर्धी असल्याचं सिद्ध केलं नाही तर बॉलिवूडमधील सर्वात बँकिंग स्टार म्हणून त्यानं स्वतःच स्थान भक्कम केलं. 2024 हे निश्चितच राजकुमार रावचे वर्ष आहे आणि एक कलाकार म्हणून त्याचे यश त्याच्याविषयी बरंच काही सांगून जातं. त्याचं यश केवळ पात्र साकारण्यापुरतं नाही, तर ते चित्रपटसृष्टीची व्यावसायिक बाजू समजून घेणे देखील आहे. चित्रपट बनवण्यामध्ये गुंतलेल्या अर्थशास्त्राबद्दल तो खूप जागरूक आहे, त्यामुळेच तो चित्रपटगृहात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासोबतच त्याच्यात कलात्मक दृष्टीला पूर्ण करण्याची क्षमता आहे. बाकीच्या गोष्टी त्याच्या कलेवरच्या प्रत्येक भूमिकेतून दिसून येतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चित्रपटांच्या कामगिरीवर भाष्य करताना, व्यापार विश्लेषक जोगिंदर टुटेजा म्हणाले, 'राजकुमारने सलग दोन वेळा यश मिळवलं हे खरोखरच उल्लेखनीय आहे. ज्या काळात आपण इतक्या चित्रपटांचा 15-25 कोटींचा संपूर्ण कलेक्शन पाहत नाही, तिथे राजकुमारनं 100 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन करत यश मिळवलं आहे. तेही केवळ दीड महिन्यात हे खरोखर उल्लेखनीय आहे. तो एक असा कलाकार आहे, जो या सर्व गोष्टींचा समतोल साधतो.  हे देखील अतिशय विलक्षण आहे की त्यानं थिएटर किंवा ओटीटी रिलीझमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत जे इतर कोणत्याही अभिनेत्यानं केवळ 12-13 वर्षात केलं नाही'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : 'प्रेग्नंसीत 9 महिने मी...'; बियर पिण्याच्या डोहाळ्यांविषयी मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

या वर्षी आणखी दोन रिलीजसह राजकुमार राव बॉक्स ऑफिसवर आपली विजयी मालिका सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे. हा अभिनेता आगामी हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' मध्ये 'विक्की' ची बहुप्रतीक्षित भूमिका पुन्हा साकारणार आहे. जो 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तो तृप्तीसोबत प्रथमच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' मध्ये तो दिसणार आहे.