Aditi Sarangdhar Drank Beer During Pregnancy : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अदिती सारंगधर ही नेहमीच चर्चेत असते. अदितीनं आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण अदितीला खरी ओळख ही 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून मिळाली आहे. अदितीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यापासून तिच्या करिअरपर्यंत अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यावेळी तिनं सांगितलेली एक गोष्ट ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले ती म्हणजे तिला कोणत्या प्रकारच्या जेवणाचे नाही तर थेट बियर पिण्याचे डोहाळे लागले होते.
अदितीनं ही मुलाखत 'आरपार ऑनलाईन' या युट्यूब चॅनलला दिली होती. या मुलाखतीत तिनं प्रेग्नंसी आणि त्यानंतरच्या काळावर वक्तव्य केलं आहे. अदिती तिच्या बियरच्या डोहाळ्याविषयी बोलताना म्हणाली की "गरोदर असल्याचं समजल्यानंतर मी खूप उत्सुक होते. त्यावेळी मला बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते आणि मी प्रेग्नंन्सीमध्ये बिअर प्यायचे. मी इंडियन फूड खाल्लच नाही. मी फक्त सलाड खायचे आणि बिअर प्यायचे. पण याआधी मी डॉक्टरांना विचारलं होतं की मी काय करू? मला कसं तरी होतं. बिअर नाही प्यायले तर मला राग येतो. मग त्या मला म्हणाल्या की 2-2 सीप प्या. मग मी 9 महिने बिअर प्यायले. भात आणि फोडणी वगैरे घातली की त्यातील एक एक मोहरी काढून बाजूला करायचे. घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे इंडियन फूडच बंद केलं. फक्त सलाड आणि बिअर...'
हेही वाचा : 'मला तिच्याबद्दल सहानुभूती..', कंगनाला CISF जवाननं कानशिलात लगावल्याप्रकरणी पहिल्यांदाच बोलले संजय राऊत
त्यानंतर पुढे अदितीनं तिच्या पोस्टापार्टम डिप्रेशनविषयी देखील सांगितलं. अदितीनं सांगितलं की, 'अनेकांना माहित नसतं की प्रेग्नंन्सीनंतर पोस्टमार्टम डिप्रेशनदेखील येतं. त्यावेळी त्या महिलेला स्विंग्स होतात आणि ती कधीही रडते. मला बऱ्याचवेळा आवर्जुन सांगावसं वाटतं की बाळंतीण झालेल्या महिलेची काळजी घ्या. ती स्त्री आनंदी राहिली पाहिजे. तेव्हाच तिच्या मुलाची काळजी घेऊ शकले. येणारी माणसं बाळाला बघायला येतात, पण त्यांना त्या आई विषयी काही वाटतं नाही तिनंही तर तितकंच सोसलेलं असतं. मी माझ्या बाळाला कोणच्या हातात द्यायचे नाही, कारण त्याला काही इन्फेक्शन झालं तर रात्री जागायला किंवा त्याची काळजी घ्यायला कोणी येणार नाही. माझ्या मदतीला कोणी असेल का तर नाही.'