Raju Srivastava Death : अनेक वर्ष खळखळवून हसरवणारे राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava Passed Away) यांचं बुधवारी (21 ऑगस्ट 2022) निधन झालंय. प्रेक्षकांना कायम हसवणारे 'गजोधर' जाता जाता रडवून गेले आहेत. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टला नेहमीप्रमाणे वर्कआऊट करत होते. या दरम्यान धावता धावता ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर बुधवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
गेल्या काही वर्षांमध्ये Gym मध्ये वर्कआऊट करत असताना अनेक सेलिब्रिटी (celebrity) असो किंवा खेळाडू (player) यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. कमी वयात अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा घटना आपण पाहिल्या आहेत. त्यानंतर अनेक लोकांच्या समोर हा प्रश्न पडला आहे की, जिममध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य? जिम करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका आहे का? राजू श्रीवास्तव यांच्या जाण्यामुळे हे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. यावर आरोग्य तज्ज्ञांचं काय मत ते पाहूयात (raju srivastav passes away and heart attack during workout at gym nm )
आम्ही आरोग्य तज्ज्ञांशी यासंदर्भात बोलो तर त्यांचा मते, गेल्या काही वर्षांपासून देशात बैठी जीवनशैलीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना काळात गेल्या 2 वर्षात घरातून वर्क फ्रॉम होम करताना लोक तासंतास एका जागेवर बसून काम करत आहे. ऑफिसमध्येही अगदी 9 ते 10 तास एका जागेवर बसून लॅपटॉप किंवा पीसीसमोर काम केलं जातं आहे. या अशा जीवनशैलीला बैठी जीवनशैली म्हटलं जातं.
बैठी जीवनशैली सोबत अनेक अशा चुका लोक करत आहेत. ज्यात शरीराला कुठलाही व्यायाम न करणे. अगदी गाडी आणि लिफ्टमधून प्रवास त्यामुळे चालणे होत नाही. त्याशिवाय खाण्यापिण्याची चुकीची सवय अशामुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे.
आता आपण बोलूयात व्यायाम प्रेमी लोकांबद्दल. तर अनेक लोकांना अचानक जिमला जाऊन व्यायाम करण्याचा साक्षात्कार होतो. अशात फिट आणि बॉडी बनविण्यासाठी लोक जीममध्ये भरपूर वेळ घालवतात. बॉडी बनविण्याच्या नादात Heavy एक्साइज करतात. ट्रेडमिलवर जास्त जास्त वेळ गतीने धावतात. या चुकीमुळे त्यांचा हृदयावर भार वाढतो. अशामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. तसंच तरुणामध्ये योग्य प्रकारे जिममध्ये व्यायाम न केल्यामुळे त्यात योग्य पद्धतीने आणि हेल्दी डाएट न घेतल्यामुळे कमी वयात हृदय विकाराचा त्रास दिसून येत आहे.
हृदयविकाराचा झटका येण्यामागे हाइ ब्लड प्रेशर आणि हाइ कोलेस्ट्रॉल हे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय या सवयीसुद्धा हृदयविकारासाठी कारणीभूत असतात. जर तुम्हाला या सवयी असेल तर त्वरित ती सोडा.
1. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन
2. धूम्रपान
3. मद्यपान
4. अधिक तणाव घेण्याची सवय
5. जास्त फॅटयुक्त पदार्थांचं सेवन
6. एका जागेवर तासंतास बसून काम करणे
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)