Raju Srivastava Death : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) गेल्या 1 महिन्याहूंन अधिक काळापासून रुग्णालयात दाखल होते. जीवन- मृत्यूची झुंज देत असताना त्यांचे आज (21 सप्टेंबर 2022) निधन झाले. मधल्या काळात त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याच्याही बातम्या समोर आल्या, पण त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि जगाचा निरोप घेतला. (Raju Srivastavas journey will make fans cry know about his family career)
राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपूरमध्ये (Kanpur) झाला होता. अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या या अभिनेत्यासाठी प्रेक्षकांसोबतच कानपूरमधील त्यांच्या घरीसुद्धा त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली जात होती. असंख्य चाहत्यांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारा हा विनोदवीर आज मात्र सर्वांनाच रडवून निघून गेला. आजच्या क्षणाला श्रीवास्तव यांच्या आयुष्यातील किस्से वाचताना नकळतच डोळ्यात पाणी येतं...
कानपुर ते मायानगरी पर्यंतचा प्रवास कॉमेडियन राजू श्रीवास्तव म्हणजेच 'राजू भैय्या'ने टॅलेंटच्या जोरावर केला. कित्येक वर्ष त्यांच्या कॉमेडीने लोकांच्या मनावर राज्य केले. कॉमेडीच्या या किंगला 'गजोधर भैय्या' या नावाने देखील लोक ओळखतात. राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिंसेबर 1963 यादिवशी झाला. त्यांचे वडिल रमेश चंद्र श्रीवास्तव प्रसिद्ध कवी होते. ते बलाई काका या नावाने कविता लिहायचे. एका मुलाखतीदरम्यान राजू श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, बालपणी त्यांना कविता म्हणायला सांगायचे तेव्हा ते लोकांच्या वाढदिवसाला कविता ऐकवायचे.
आणखी वाचा... Raju Srivastava यांना 'या' व्यक्तिरेखेतून खऱ्या अर्थाने मिळाली प्रसिद्धी
राजू श्रीवास्तव 1982 मध्ये मुंबईला आले आणि इथून सुरु झाला त्यांचा कॉमेडीचा प्रवास. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी पोटापाण्यासाठी ऑटो रिक्षाही चालवली. त्यांनतर त्यांनी चित्रपटांत लहान-सहान रोल देखील केले. अनिल कपूरच्या (Anil Kapoor) 'तेजाब' या चित्रपटातून राजू श्रीवास्तव यांनी बॉलिवुड (Bollywood) मध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील कॉमेडी (Comedy) चाहत्यांच्या पसंतील उतरली. त्यानंतर त्यांनी सलमान खानच्या (Salman Khan) 'मैंने प्यार किया' या चित्रपटात ट्रक क्लीनरची भूमिका केली. याव्यतिरिक्त त्यांनी शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'बाजीगर' या चित्रपटात कॉलेज स्टूडेंटच्या भूमिकेत दिसले. त्यांनी 'आमदनी अठन्नी खर्चा रुपइया' मध्ये 'बाबा चिन चिन चू', 'वाह तेरा क्या कहना' मध्ये 'बन्ने खान'च्या सहाय्यकाची भूमिका, तर 'मैं प्रेम की दिवानी हूँ' मधील 'शंभू'ची छोटेखानी भूमिका साकारली होती.
बिग बीं (Big B) चा 'शोले' (Shole) हा चित्रपट त्यांना खुप आवडला होता. तेव्हापासूनच ते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे फॅन (Fan) झाले. हा चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यारखे बोलणे, चालणे, बसणे त्यांनी सुरु केले. त्या चित्रपटाचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. इथूनच गजोधर भैय्याने अमिताभ बच्चन यांची मिमिक्री (Mimicry) करायला सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांचीच मिमिक्री केल्यावर पहिल्यांदा त्यांना 50 रुपये मिळाले होते.
इंडस्ट्रीमध्ये बराच काळ आपले टॅलेंट दाखवल्यानंतर श्रीवास्तव यांनी एका मोठ्या संधीची गरज होती. तो दिवस लवकरच उजडला जेव्हा राजू श्रीवास्तव यांनी 2005 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो'मध्ये भाग घेतला होता. या शोमुळे राजू श्रीवास्तव यांचे आयुष्य बदलले, खूप प्रसिद्धी मिळाली. हाच तो 'शो' होता ज्यामध्ये राजू भैय्या कॉमेडी किंग झाले आणि घरोघरी 'गजोधर भैय्या' या नावाने ओळखले जाऊ लागले.
'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'नंतर, राजू श्रीवास्तव यांनी प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' 3 (Bigg Boss 3) मध्ये देखील भाग घेतला होता. यानंतर ते 'कॉमेडी शो महामुकबाला सीझन 6' आणि 'नच बलिए'सारख्या शोमध्येही दिसले. 'नच बलिए'मध्ये राजू श्रीवास्तव पहिल्यांदाच पत्नीसोबत दिसले होते.