Katrina ला ऑफ कॅमेरा Kiss करणाऱ्या अभिनेत्याला अमिताभ बच्चन यांनी पकडल्यानंतर...

बंद खोलीत कतरिनाला 'या' अभिनेत्यासोबत Kiss करताना बिग बींनी पाहिलं आणि....  

Updated: Sep 21, 2022, 12:45 PM IST
Katrina ला ऑफ कॅमेरा Kiss करणाऱ्या अभिनेत्याला अमिताभ बच्चन यांनी पकडल्यानंतर...

मुंबई :  अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. आज बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ असं म्हणायला हरकत नाही. गेल्या 19 वर्षांपासून कतरिना चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. अभिनेत्री अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम देखील केलं आहे. मात्र, कतरिनावर एक वेळ अशी आली होती जेव्हा तिला इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. 

अभिनेत्री कतरिनाने 2003 साली 'बूम' सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांचा 'बूम' सिनेमा बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत होता.  सिनेमातील एका सीनमध्ये कतरिनाला गुलशन ग्रोवरसोबत (Gulshan Grover) किसिंग सीन (kiss) करायचा होता. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतु या घटनेबद्दल आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

खुद्द गुलशन ग्रोवरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो किसिंग सीन करण्यासाठी खूप घाबरला होता. त्याचा हा पहिला किसिंग सीन असल्यामुळे काय करावं हे त्याला कळत नव्हतं. यासाठी बंद खोलीत त्याने कतरिनासोबत सरावही केला. 

Katrina ला ऑफ कॅमेरा Kiss करत होता गुलशन ग्रोव्हर, अमिताभ बच्चन यांनी दोघांना पकडलं रंगेहात

गुलशनने सांगितले की, तो सराव करत असताना महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) खोलीत आले आणि त्यांनी हे सर्व पाहिलं. त्यावेळी बिग बींनी त्याला प्रोत्साहन दिले असले, तरी गुलशन ग्रोवरची अवस्था खूपच वाईट झाली होती.

कतरिना आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यात चित्रित केलेला हा सीन चांगलाच व्हायरल झाला होता. याबद्दल बोलताना कतरिना नेहमी म्हणते की, "हा सीन मी स्वत: केला होता आणि या गोष्टीला मी नाकारत नाही, परंतु त्यावेळेला मी फारच अस्वस्थ होती."

कतरिना कैफचे आगामी सिनेमे (Katrina Kaif upcoming film)
कोरोना व्हायरसनंतर कतरिनाचा 'सुर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आता कतरिना लवकरच अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री साऊथ अभिनेता विजय सेतुपतीसोबत 'मेरी किसेस' या सिनेमातही दिसणार आहे, ज्याचं शूटिंग सध्या सुरू आहे.