घटस्फोटानंतर रितेशचा मोठा निर्णय; म्हणाला, 'द्वेष करणाऱ्यांचे बोलणे...

ज्यामध्ये दोघेही फोटोग्राफरसमोर डान्स करताना दिसत आहेत.

Updated: Feb 17, 2022, 07:28 PM IST
 घटस्फोटानंतर रितेशचा मोठा निर्णय; म्हणाला, 'द्वेष करणाऱ्यांचे बोलणे... title=

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतने रितेशपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच तिने याबाबत सोशल मीडियावर घोषणा केली. मात्र, रितेशपासून वेगळं झाल्याने राखीला खूप दुःख झाले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राखी अनेकदा तिची बाजू मांडली आहे. पण आता रितेशला राखी सावंतसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी पुसून टाकायच्या आहेत. ही गोष्ट त्याने स्वतः एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितली आहे.

रितेश सिंगने इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीसोबतचा स्वतःचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही फोटोग्राफरसमोर डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या आठवणी पुसून टाकण्याची गरज आहे' अनेक वेळा लोकांनी रितेशवर आरोप केला की तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी राखीसोबत होता आणि नंतर तिला सोडून गेला. यावरही त्याने उत्तर दिले आहे. तसेच त्याने राखीसाठी काय केले हे सांगितले.

रितेशने लिहिले, एखादी व्यक्ती एखाद्याला आनंदी ठेवण्यासाठी काय करते? कंम्प्यूटर इंजिनीयर रातोरात बिग बॉसच्या घरात जातो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अॅक्टींग करत नाही, खेळ प्रामाणिकपणे खेळतो. पहिल्यांदाच डान्स सुद्धा करतो, तरीही बाहेर पडतो. बाहेर आल्यावरही तो द्वेष करणाऱ्यांचे बोलणे ऐकतो. मग धाडसाने काही रील्स काढतो, तरीही कोणी खुश नसेल तर काय चुकलं आहे? असा सवाल त्याने केला आहे.