close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

श्रीदेवींच्या जाण्याने जगावेसे वाटत नाही : राखी सावंत

हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.

Updated: Feb 26, 2018, 10:50 PM IST
श्रीदेवींच्या जाण्याने जगावेसे वाटत नाही : राखी सावंत

मुंबई : हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.

वयाच्या 54 व्या वर्षी अकाली निधन झाल्याने श्रीदेवीचे चाहते आणि बॉलिवूडनेही हळहळ व्यक्त केली आहे.  

राखी सावंतची प्रतिक्रिया - 

श्रीदेवींचा अखेरचा निरोप घेण्यासाठी अनेक चाहते त्यांच्या घराबाहेर थांबले आहे. अभिनेत्री राखी सावंतनेही तिच्या भावना इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. श्रीदेवी खूप चांगल्या कलाकार होत्या. तुमचं अशाप्रकारे जाणं अपेक्षित नव्हतं अशा भावना व्यक्त करताना आता मला जगावसंच वाटत नाही असे  राखी सावंत व्हिडिओ पोस्टमध्ये म्हणाली आहे. 

 

 

लग्नसमारंभासाठी दुबईत 

मोहित मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी परिवारासह दुबईत पोहचल्या होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांनी लग्नात सहभाग घेतला. लग्न सोहळ्यात डान्सही केला. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातच श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने कपूर कुटुंबीयाला मानसिक धक्का बसला आहे.  

 

श्रीदेवींचा मृत्यू कशामुळे ? 

सुरूवातीला कार्डीएक अरेस्टमुळे श्रीदेवींचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनुसार टबबाथमध्ये पडून आणि बुडून मृत्यू झाल्याचे कारण देण्यात आले आहेत. सोबतच श्रीदेवीच्या रक्तात दारूचा अंश असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.  त्यामुळे श्रीदेवींचे मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे.