रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर सक्रिय होताच...

नेटकऱ्यांकडून होत आहे ट्रोल.   

Updated: Oct 17, 2020, 05:07 PM IST
रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर सक्रिय होताच...

मुंबई : बॉलिवूडच्या झगमगत्या जगात कधी काय होईल काय सांगता येत नाही. १४ जूनला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण. बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आल्यानंतर कलाकारांना मोठा धक्काच बसला. या प्रकरणामध्ये अनेक बड्या कलाकारांचे नाव  देखील पुढे आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग. 

ड्रग्स प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबीकडून रकूलची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा पासून रकुल सोशल मीडियापासून दूर होती. मात्र आता तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. परंतु सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Move , stretch , strengthen and simply let go 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet) on

रकूलने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती योगा करताना दिसत आहे. शिवाय त्यासंदर्भात तिने एक कॅप्शन देखीले दिले आहे. मात्र तिच्या या फोटोमुळे ती सोशल मीडिया वर ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर निशाणा साधत कमेंट केल्या आहेत. 

एका युजरने 'कोकीनचे सेवन जास्त प्रमाणात केल्याचं दिसत आहे..' तर दुसऱ्या एका युजरने 'तुम्हाला हॅश जास्त पसंत आहे का?' असा प्रश्न विचारत रकूलवर निशाणा साधला आहे. दरम्यान ड्रग्स प्रकरणामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोन, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचं देखील नाव पुढे आलं आहे.