'संजू' सिनेमांत अनुष्का नेमकं काय साकारतेय?

राजकुमार हिरानी म्हणाले, हे कारण ऐकून हसू नका... 

'संजू' सिनेमांत अनुष्का नेमकं काय साकारतेय? title=

मुंबई : राजू हिरानी दिग्दर्शित संजू या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजू बाबाची भूमिका साकारत आहे. 30 मे रोजी या सिनेमाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरद्वारे सिनेमातील इतर कॅरेक्टरची देखील ओळख झाली. या ट्रेलर दरम्यान दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एक मोठा खुलासा केला. आणि त्यावर ते म्हणाले की, अनुष्का शर्मा या सिनेमांत कोणता रोल करत आहे. हे कळलं तर तुम्हाला हसू आवरणार नाही. 

हे कॅरेक्टर अनुष्का साकारत आहे?

राजू हिरानी यांनी सांगितलं आहे की, जेव्हा कोणता बायोपिक बनवला जातो तेव्हा काही कॅरेक्टर्सना कॉम्प्रेस कराव लागतं तर काहींना वाढवाव लागतं. गोष्ट सांगितली जाते मात्र अनेकांना मागे - पुढे करावं लागतं. अनुष्का शर्मा या सिनेमांत असल्याच ट्रेलरवरून स्पष्ट झालं. अनुष्का शर्मा या सिनेमांत नेमकं काय रोल करते हे सांगितलं तर तुम्हाला हसू येईल. अनुष्का शर्मा आता मी जो रोल करत आहे. म्हणजे बायोपिक बनवणं तोच रोल अनुष्का शर्मा या सिनेमांत करत आहे. 

आम्ही सिनेमांत असं दाखवलं आहे की, अनुष्का शर्मा ही एक बायोग्राफर आहे. जी लंडनमध्ये राहते. ही बायोग्राफर भारतात आली असून संजय दत्तची अशी इच्छा असते त्यांच्यावर पुस्तक लिहाव. पण तिला हे पुस्तक लिहिण्याची इच्छा नव्हती. खरं तर हा सिनेमा जेव्हा बनवायचा विचार केला गेला तेव्हा देखील तो करायचा की नाही असा प्रश्न संजय दत्तला पडला होता. तेव्हा आम्ही सतत पोलीस, वकिल आणि कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधत होतो. आणि हीच भूमिका अनुष्का शर्मा सिनेमांत साकारत आहे. एका लेखिकेच्या रुपात ती समोर आली आहे.