श्रीदेवींच्या निधनावर रामगोपाल वर्मांची हृद्यस्पर्शी प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 01:30 PM IST
श्रीदेवींच्या निधनावर रामगोपाल वर्मांची हृद्यस्पर्शी प्रतिक्रिया title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

अनेकांना बसला धक्का

श्रीदेवी आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी तेथे गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. बोनी कपूर मुंबईला परतले होते पण त्यांच्या मुली दुबईला त्यांच्या सोबत होत्या.

श्रीदेवांचं निधन झालंय यावर कोणाला विश्वासच बसत नाही आहे. अनेकांकडून यावर प्रतिक्रिया येत आहे. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी देखील यावर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

रामगोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया

रामगोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे की, 'मला विश्वासच होत नाहीये की श्रीदेवी नाही राहिल्या. ते तर बरं झालं की त्यांची सुंदरता आम्ही दिग्दर्शकांनी कॅमेऱ्यात कैद करुन ठेवली आहे. ती देवी होती. मी देवाला धन्यवाद देतो की, त्याने तिला बनवलं. मी लूईस लूमियरला धन्यवाद देतो ज्याने कॅमेरा बनवला. ज्यामध्ये आम्ही श्रीदेवीला नेहमी कैद करुन ठेवलंय. मी आताही विश्वास करु शकत नाहीये ती नाही राहिली. मी माझ्या अंथरुणावर फक्त तिच्या आठवणी जागवतोय.'

'कदाचित हे एक वाईट स्वप्न असावं. मी झोपेतून उठावं आणि सगळं ठीक असावं. पण माहित आहे की असं नाही होणार. आय हेट श्रीदेवी. कारण तिने मला एक जाणीव करुन दिली की ती पण एक मनुष्य होती. कोणती देवी नाही. तिच्या हृद्याला देखील स्पंदन होण्याची आवश्यकता आहे आणि ते हृद्य कधीही थांबू शकतं. मला गोष्टीचा तिरस्कार करतो की मला ही गोष्ट ऐकण्यासाठी जिवंत राहावं लागलं. मी देवाचा तिरस्कार करतो ज्याने तिचा जीव घेतला. मी श्रीदेवीचा पण तिरस्कार करतो जी आम्हाला सोडून गेली. मी तुझावर खूप प्रेम करतो आणि करत राहिल.'