मुंबईः बॉलीवूडमध्ये नाना प्रकारे सेलिब्रेटी अनेकांसोबत डेटिंगची, किसिंगची इच्छा व्यक्त करताना दिसतात. त्यापैंकी काही चर्चेत राहतात तर काही सेलिब्रेटी हे काही काळ चर्चेत राहून मग नंतर गुल होतात. पण त्यातही काही सेलिब्रेटी हे सतत त्यांच्या अशा वक्तव्यांवरून कायमच लाईमलाईटमध्ये राहतात. मग ते कुठल्या चित्रपटांचे हिरो असोत नाहीतर डिरेक्टर्स. सध्या अशाच एका बड्या दिग्दर्शकाच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा आहे. लवकरच त्याचा एक भव्यदिव्य सिनेमा इंटरनॅशनली रिलिझ होणार आहे.
नुकतेच एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाने प्रसिद्ध मार्शल आर्ट्स आयकॉन ब्रूस लीचा आपण मोठा चाहता असल्याचे उघड केले. पण त्यावर त्यांनी केलेला खुलासा त्यांच्या चाहत्यांसाठी धक्का देणारा होता. फ्लिममेकर राम गोपाल वर्मा सध्या 'लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन' नावाच्या त्याच्या एका मोठ्या फिल्म रिलिजच्या प्रतिक्षेत आहेत व त्यासाठी ते तयारी करत आहेत. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच या बॉलिवूड दिग्दर्शकाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत एक गुपीत सांगितलं. ज्यात राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या फिमेल नाही तर मॅन क्रशबद्दलही खुलासा केला आहे.
राम गोपाल वर्मा म्हणाले की, ''मी समलैंगिक (गे) नाही पण जर या जगात एखादा माणूस असेल ज्याचा किस घेण्यास काहीच हरकत नाही तर तो ब्रूस ली आहे. मी कोणी गे नाही पण मला जगातल्या याच व्यक्तीला किस करायचे आहे'' अशी कबूली राम गोपाल वर्मांनी दिली. ब्रुस लीवर बोलताना राम गोपाल वर्मा म्हणाले की, ''त्याचे डोळे सुरेख होते, त्याची फायटिंग स्पिरिट मला आकर्षक करायची त्यामुळे ब्रुस लीबद्दल बोलायचे म्हणजे शब्द कमी पडतात.''
चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी स्पष्ट केले की त्यांचा आगामी सिनेमा हा 1973 च्या ब्रुस लीच्या 'एन्टर द ड्रॅगन' चित्रपटापासून प्रेरित आहे. ते पुढे म्हणाले की, ''चित्रपटाच्या अनेक गोष्टी या ब्रुस लीच्या 'एन्टर द ड्रॅगन' या चित्रपटावरूनच घातल्या आहेत. अभिनेत्री पूजा भालेकर 'लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन'मध्ये मुख्य भूमिकेत आहे. पूजा भालेकर वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तायक्वांदो शिकली आहे आणि आगामी चित्रपटासाठी तिला सुमारे तीन वर्षे मार्शल आर्ट्स प्रशिक्षण घ्यावं लागलं. 'लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन' 15 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे.