मुंबई : 'एक जान हैं हम' हा सिनेमा अभिनेत्री दिव्या राणाचा पहिला चित्रपट होता पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पडला. हा चित्रपट चालला नाही, राजीव कपूर आणि दिव्या राणा ही जोडीदेखील चाहत्यांना आवडली नाही. पण राजीवचे वडील राज कपूर यांनी तरी देखील दोघांसोबत 'राम तेरी गंगा मैली' हा सिनेमा बनवाला. मात्र, या चित्रपटाचं सगळं श्रेय मंदाकिनी यांनी घेतलं. ट्रान्सपरंन्ट साडीमध्ये भिजलेला एक बोल्ड सीन, आणि या सीननंतर मंदाकिनी एका रात्रीत स्टार बनल्या आणि दिव्या राणा मात्र होत्या तिथेच राहिल्या मंदाकिन यांच्यामुळे दिव्या यांच्या भूमिकेवर हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही
'राम तेरी गंगा मैली' बॉक्स ऑफसवर जबरदस्त हिट ठरला. मात्र दिव्याच्या करियरचा काही उपयोग झाला नाही. दिव्या तशी प्रगती करत राहिली. त्यांनी 'वतन के राखेरा', 'एक मोती', 'अस्मान' आणि 'मां कसम' या सिनेमांमध्ये काम केले. पण सुंदर असूनही त्यांना चित्रपट जगात हवं तितकं यश मिळालं नाही
यश आणि प्रसिद्धीचं स्वप्न घेऊन दिव्या चित्रपटांत आली, मात्र ती याच्यापासून दूरच राहिली. यानंतर दिव्या राणाने चित्रपट करणं सोडले. अभिनय सोडल्यानंतर दिव्याने मुंबईतील बिझनेसमन फाजलसोबत लग्न केलं आणि मुंबईत स्थायिक झाल्या, पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी लग्नानंतर स्वत: नाव बदलून सलमा मानेकिया केलं
मुंबईतच दिव्या फोटोग्राफर म्हणून काम करत आहे. याशिवाय ती एक मूर्तीकार असून मातीची मूर्ती तयार करते. त्यापैकी बरीच फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. याशिवाय ती दोन मुलांची आई देखील आहे.
दिव्या वूमन क्लोथिंकचं कामही करतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दिव्या बऱ्याचवेळा तिच्या कपड्यांच्या प्रोडक्ट्सला प्रमोट करण्यासाठी पोस्ट्स शेअर करते. आधीपेक्षा तिचा लूकही खूप बदलला आहे. मात्र तिचं सौंदर्य पूर्वीसारखंच आहे.