बॉक्स ऑफिसवर Thank God च्याही पुढे रामसेतू? जाणून घ्या 5 व्या दिवशीच कलेक्शन

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूडच्या मंडळींनी आपले चित्रपट प्रमोट आणि रिलिज करण्याचा योग्य कालावधी निवडला तरी मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी भरारी मारलेली नाही. 

Updated: Oct 30, 2022, 06:31 PM IST
बॉक्स ऑफिसवर Thank God च्याही पुढे रामसेतू? जाणून घ्या 5 व्या दिवशीच कलेक्शन title=

Ramsetu and Thank God Box Office Collection: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगणच्या (Ajay Devgan) चित्रपटांमधील संघर्षाची झळ वारंवार बॉलिवू़डला सतावत होती. हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती की या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील (Box Office Collection) कमाई चांगली असेल. त्यानूसार सुरूवातीला म्हणजे चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झाल्या झाल्या या चित्रपटांचा फुगवलेला फुगा अचानक जोरदार आपटला. त्यानंतर या दोन्ही चित्रपटांमध्ये जोरदार सुरस पाहायला मिळाली होती. (ramsetu and thank god box office collection see how much these films earned on 5th day)

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूडच्या मंडळींनी आपले चित्रपट प्रमोट आणि रिलिज करण्याचा योग्य कालावधी निवडला तरी मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (Bollywood Films Flop on Box Office) म्हणावी तशी भरारी मारलेली नाही. त्यामुळे फ्लॉप ठरलेले चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घटांगळ्या खात आहेत. अक्षय कुमारचा चित्रपट 'राम सेतू' (Ram Setu) आणि अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर 'थँक गॉड' (Thank God) चित्रपटगृहांमध्ये एकत्र प्रदर्शित झाले. अक्षयच्या चित्रपटात भगवान श्री रामाच्या कथेशी खोल संबंध आहे.

'राम सेतू'चा ट्रेलर लोकांना खूप आवडला आणि लोक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. दुसरीकडे अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग स्टारर 'थँक गॉड' हा कॉमेडी चित्रपट आहे. हे दोन्ही चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाले असून पहिल्या दिवसाच्या कमाईवरून अक्षयच्या चित्रपटाला अधिक पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

चित्रपटांमध्ये स्पर्धा? मंगळवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांपैकी अक्षयच्या 'राम सेतू'ला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात मिळाली आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 15 कोटींहून अधिक कमाई केली. या वर्षी बॉक्स ऑफिसवर 3 मोठे फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अक्षयसाठी हा आकडा दिलासादायक ठरला. एकूणच चित्रपटाची कमाई चांगली होत आहे आणि हळूहळू बॉक्स ऑफिसवर (Today's Box Office Collection) हिट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण हा प्रवास थोडा लांबणार आहे. दुसरीकडे अजय देवगणच्या 'थँक गॉड'ला पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागला आणि 'राम सेतू'ला टक्कर देण्यासाठी त्याचे कलेक्शन काहीसे मागे पडले. 5 व्या दिवशी दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिसचे गणित काहीसं चित्रपट असं होतं. 

शुक्रवारी अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राच्या (Siddharth Malhotra) 'थँक गॉड'ने गुरुवारपेक्षा कमी कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर 3.30 कोटींची कमाई केली. 'थँक गॉड'च्या कमाईत थोडीशी सुधारणा झाल्याचे शनिवारचे सुरुवातीचे आकडे सांगत आहेत आणि चित्रपटाने जवळपास 3.80 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार 5 दिवसांत भारताचे 'थँक गॉड'चे कलेक्शन 25 कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त झाले आहे.  

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

'राम सेतू'नं केलं 'थँक गॉड'ला ओव्हरटेक? 
समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या 'राम सेतू'चे शुक्रवारी 6.05 कोटींचे कलेक्शन झाले जे गुरुवारपेक्षा 2 कोटींनी कमी होते. पण शनिवारी चित्रपटाच्या कमाईत थोडी सुधारणा झाली आहे आणि सुरुवातीच्या अंदाजानुसार 'राम सेतू'ने 5 व्या (5th Day Collection) दिवशी जवळपास 7.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.