मुंबई : 'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वतीची भूमिका साकारुन घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीने दोन वेळा लग्न केलं आहे. अभिनेत्रीने फार कमी वयात असा निर्णय घेतला होता ज्यामुळे तिला त्याचा नंतर पश्चातापही झाला होता. या सगळ्यामुळे तिझ्या फॅमिलीनेदेखील तिला त्या काळात सोडून दिलं. एका मुलाखतीत याबाबत अभिनेत्रीने स्वत: खुलासा केला होता. मात्र या सगळ्यानंतर लगेचच तिची चूक तिच्या लक्षात आली.
वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री घरातून पळून गेली होती. एवढंच नव्हेतर लग्नाआधी ही अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट होती. पूजा बॅनर्जीने 2004 मध्ये तिचा बॉयफ्रेंड अरुणॉय चक्रवर्तीसोबत सातफेरे घेतले होते. लग्नानंतर लगेचच त्यांच्या नात्यात दुरावा आला. नंतर दोघांनी 2013 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
पहिलं लग्न तुटल्यानंतर पूजाने तिचं दुख: विसरण्यासाठी आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने तिच्या करिअरवर फोकस केला. यानंतर तिने 'देवो के देव महादेव'मध्ये पार्वतीचं रोल केला. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालं. यानंतर तिला खरी ओळख मिळाली. याशिवाय अभिनेत्रीने कसोटी जिंदगी की मध्ये दिसली आहे. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजपर्यंत तिने अनेक पात्र साकारली आहेत.
दरम्यान, त्याची भेट टीव्ही अभिनेता कुणाल वर्माशी झाली. त्यांच्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये गोव्यात लग्न केले. मात्र, त्याआधीच 2020 मध्ये पूजा आई झाली.
यादरम्यान तिची टीव्ही अभिनेता कुणाल वर्माशी ओळख झाली. यांच्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाआधीच 2020 मध्ये पूजा आई झाली.
तिच्या लग्नाविषयी बोलताना पूजा म्हणाली होती की, "आम्ही बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केलं. आमचं लग्न झालं असलं आणि मूल झालं असलं तरी, पुन्हा लग्न करणं ही एक नवीन अनुभूती देणारं आहे. यामुळे आमच्या नात्यात नवीनता आली आहे. आमच्या नात्यात काहीतरी नवीन आहे. जरी आमचे नातेवाईक आम्हाला नवविवाहित जोडप्यासारखे वागवत असतील आणि आम्हाला जेवायला बोलावत असतील. यापूर्वी त्यांनी संकटकाळातही आम्हाला फोन करायचे नाही.'