मुंबई : बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचवर नेहमी चर्चा होत असते. अनेक मोठ्या स्टार्सने याबद्दलचे आपले विचार मोकळेपणाने मांडले आहेत. मंगळवारी रणबीर कपूरच्या संजू सिनेमाचा टिझर मुंबईत प्रदर्शित झाला. या टिझर लॉन्चिंगवेळी रणबीर कपूरला बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबद्दल विचारण्यात आले. आता रणबीर संजू या सिनेमातून संजय दत्तची जीवनकथा रुपेरी पडद्यावर दाखवणार आहे.
यावेळी पहिल्यांदा रणबीर कास्टिंग काऊच या सेनसिटिव्ह विषयावर बोलला. तो म्हणाला की, मला तरी कास्टिंग काऊचचा सामना कधी करावा लागला नाही. पण जर सिनेसृष्टीत असे होत असेल तर हे अगदी दुःखद आहे.
कोरिओग्राफर सरोज खान यांनी बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे तिला टिकांचा सामना करावा लागला. याबद्दल सरोज खान म्हणाल्या की, हे सर्व मुलींच्या सहमतीने होते. लैगिंक शोषणाच्या बदलात त्यांना काम मिळते.
I have never faced it. If it exists, it is really sad: Ranbir Kapoor in Mumbai on a question about #castingcouch in Bollywood. pic.twitter.com/JzbgMUEYj9
— ANI (@ANI) April 24, 2018
एएनआयनुसार, कास्टिंग काऊचवर बोलताना कोरियोग्राफर सरोज खान म्हणाल्या की, हे खूप पूर्वीपासून सुरु आहे. हे फक्त सिनेसृष्टीत नाही तर इतर इंडस्ट्रीमध्येही होते. तर तुम्ही याबद्दल नेहमी सिनेसृष्टीकडे बोट दाखवणे बंद करा. त्यातून कमीत कमी उत्पन्न तरी मिळते. रेप करुन सोडून दिले जात नाही.
पुढे त्या म्हणाल्या की, हे मुलीवर अवलंबून आहे की तिला काय करायचे आहे. तुमच्याकडे जर कला असले तर ती वापरा आणि वाचवा स्वतःला यापासून. त्यामुळे लोकांनी सिनेसृष्टीला काहीही बोलणे थांबवावे. सिनेसृष्टी आमच्या पालकांप्रमाणे आहे.