रणबीर-आलियाने केलं विकी-कतरिनाला कॉपी; पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 'वास्तू'मध्ये नुकतीच लग्नगाठ बांधली.

Updated: Apr 16, 2022, 02:10 PM IST
 रणबीर-आलियाने केलं विकी-कतरिनाला कॉपी; पाहा फोटो title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 'वास्तू'मध्ये नुकतीच लग्नगाठ बांधली. पण या भव्य लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आलिया भट्टने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्न आणि मेहंदी सोहळ्याचे पहिले फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो समोर येताच तुफान व्हायरल झाले.

विकी-कतरिनाची आठवण आली
रणबीर-आलियाच्या मेहंदी सेरेमनीचा फोटो पाहून सर्वांनाच विकी कौशल आणि कतरिना कैफचा मेहंदी सोहळा आठवतोय. विकी कौशल आणि कतरिनाचं लग्न डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये पार पडलं. 

मेहंदीचे फोटो व्हायरल
आलिया भट्टने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रणबीर कपूर आलियाच्या समोर बसला आहे आणि आलिया तिची मेहंदी दाखवत रणबीरसोबत पोज देताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर आलियाने विकी कतरिनाची पोज कॉपी  (Recreat) केली
असंच काहीसं विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात पाहायला मिळालं. जेव्हा विकी कौशलही कतरिनासमोर बसला होता आणि कतरिना तिची मेहंदी दाखवत पोज देताना दिसली होती. हे फोटो पाहिल्यानंतर रणबीर आलियाने विकी कतरिनाची ही पोज रिक्रिएट केल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.