'तुम्ही हे चुकीचं करताय', म्हणत रणबीर कपूर भडकला

आलिया रणबीरची सपोर्ट सिस्टिम आहे हे ती कायमच तिच्या कृतीतून दाखवत असते

Updated: May 1, 2021, 09:48 AM IST
'तुम्ही हे चुकीचं करताय', म्हणत रणबीर कपूर भडकला

मुंबई : गेल्यावर्षी 30 एप्रिल 2020 साली बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. चाहते आणि कपूर कुटुंबातील मंडळी देखील भावूक झाले. कुटुंबियांनी त्यांच्या घरी पूजेचं आयोजन केलं होतं. रणबीर कपूरसोबत त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्ट देखील या पूजेत सहभागी झाली होती. पण यावेळी काही कारणास्तव रणबीर कपूर भडकला आणि पापाराजीवर रागावला. 

रणबीर कपूर जेव्हा कारमधून उतरला तेव्हा पापाराजीने त्याला घेरलं. तेव्हा रणबीरने त्याला योग्य अंतर बाळगायला आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरफणे पालन करायला सांगितले. तो म्हणाला की,'तुम्ही हे चुकीचं करत आहात.' असं बोलून रणबीर पुढे निघून गेला. तिथेच आलिया देखील कारमधून उतरली आणि सरळ घरी निघून गेली. पण पापाराजीने रणबीर कपूरची सॉरी बोलून माफी मागितली.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली आलिया या कार्यक्रमाला आलिया भट्ट ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. तर रणबीर कपूर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. आलिया पिंक सूटमध्ये तर रणबीर कपूर व्हाइट टी शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला आहे. 2020 मध्ये कोरोना व्हायरसची सुरूवात झाली आहे. आणि कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. सिनेसृष्टीतील लोकप्रिय चिंटू म्हणजे ऋषी कपूर यांच आजारपणामुळे निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कपूर कुटुंबाला मोठा धक्का बसला. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर या देखील खूप दुःखी होत्या. तर रणधीर कपूर यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर लहान भावाचं म्हणजे अभिनेता राजीव कपूर यांचं निधन झालं आहे.