Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या अपयशानंतर प्रेक्षक आता दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. कलाकार आणि हा प्रोजेक्ट गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच, चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मोडियावर व्हायरल झाली होती. ज्यात अरुण गोविल हे राजा दशरथ आणि लारा दत्ता राणी कैकेयी यांचे सेटवरचे फोटो लीक झालेले दिसले. मात्र, आता रणबीर आणि पल्लवीचा लूकही लीक झाला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.
'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचे काही फोटो आता समोर आले आहेत. ज्यात रणबीर कपूर राम आणि साई पल्लवी माता सीतेच्या लूकमध्ये दिसत आहेत. झूम टीव्हीनं त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर केलेल्या 'रामायण' सेटवरील फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी एका नदीकाठी फिरताना आणि निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. दोघांनीही मरून रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले आहेत. साई पल्लवीनं सोनेरी आणि मरून दुपट्ट्यासह जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे, तर रणबीर कपूर हा जांभळ्या रंगाचं धोतर आणि मरून रंगाच्या शालमध्ये दिसत आहे.
या दोघांचा लूक खरोखर आकर्षक आहे. शाही पोशाखांसोबतच त्यांचे एक्सप्रेशन पाहून दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. साई पल्लवी कमीत कमी दागिन्यांसह हसताना दिसत आहे. दुसरीकडे, रणबीर कपूर हसताना दिसत आहे. त्याचा हा लूक त्याच्या अॅनिमल चित्रपटाच्या पूर्ण विरुद्ध आहे. रणबीर आणि साई पल्लवीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
80% of #Ramayana ‘s success will depend on #RanbirKapoors acting skills. He cannot mess up this role. & knowing him, I think he’ll kill it.
This is the toughest role & the biggest risk of his career. pic.twitter.com/OyUiIgsgnv
— V(@V_for___) April 27, 2024
मात्र, या सर्व प्रकारामुळे दिग्दर्शक नितेश तिवारी प्रचंड नाराज झाले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला देखील 'रामायण'च्या सेटवरील अरुण गोविल आणि लारा दत्ता यांचे फोटो लीक झाले होते. अरुण गोविल राजा दशरथच्या लूकमध्ये तर लारा दत्ता राणी कैकेयीच्या लूकमध्ये दिसले होते. शिवाय या लीक झालेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री शिबा चड्ढाची झलकही दिसली होती. मात्र, यानंतर नाराज झालेल्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी चित्रपटाच्या सेटवर फोन न वापरण्याचा नियम लागू केला होता. मात्र, हे नियम मोडीत काढत पुन्हा एकदा सेटवरून फोटो लीक झाल्यामुळे या सर्वांमागे कोण आहे अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
हेही वाचा : 'लोकांना हार्ट अटॅक येताना पाहिलं...'; भारती आणि हर्षनं उघड केला छोट्या पडद्यामागील खरा चेहरा
Superb look. #Ramayana will create new records surely
Biggest blockbuster loading.. pic.twitter.com/5WykLdvoL6— अपना Bollywood (@Apna_Bollywood) April 27, 2024
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' हा चित्रपट तीन भागात बनवणार असल्याचं सांगितलं जातंय. रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओल, सनी देओल आणि विजय सेतुपती सारखे कलाकार देखील चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटाचं बजेट तब्बल 600 कोटी रुपये असल्याचेही सांगितलं जातं.
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.