मुंबई : रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीश तिवारी यांच्या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाबाबत सध्या रोज बातम्या येत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, स्टार कास्ट या चित्रपटासाठी त्यांची लाईफस्टाईल बदलत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर रणबीर कपूरने शुद्ध होण्यासाठी मद्यपान आणि मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात रणबीरसोबत दक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार आहे.
कोइमोईच्या वृत्तानुसार, रणबीर मद्यपान सोडत आहे. त्याच्या पब्लिक इमेजसाठी नव्हे तर रामच्या पात्राला न्याय देण्यासाठी तो मांसाहार खाणंही सोडत आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाचं शूटिंग सुरू होईपर्यंत रणबीर मद्यपान आणि मांसाहारापासून पूर्णपणे दूर राहणार आहे.रिपोर्टनुसार, रणबीरला श्री रामसारखं शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. म्हणूनच तो हे सगळं सोडून देत आहे आणि यामुळेच तो सध्या लेट नाईट पार्टीही करत नाहीये.
शूटिंग कधी सुरू होईल
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. रणबीर आणि सई फेब्रुवारी 2024 पासून या सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू राम आणि सीता यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2024 पर्यंत संपणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, ऑस्कर विजेती कंपनी DNEG चित्रपटासाठी VFX बनवणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.