मुंबई : लग्न आणि गरोदरपण यामुळे सिनेमांपासून दूर गेलेली राणी मुखर्जी पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये परतली आहे. नुकताच राणी मुखर्जीचा 'हिचकी' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. बॉक्सऑफिसवरदेखील हा चित्रपट चांगली कामगिरी करत असल्याने राणी आणि आदित्य मुखर्जी दोघेही आनंदात आहेत. लवकरच हा चित्रपट राष्ट्रपती भवनातदेखील झळकणार आहे.
राणी मुखर्जी अभिनित 'हिचकी' हा सिनेमा लवकरच राष्ट्रपती भवनात झळकणार आहे. अशी बातमी डीएनए वृत्तपत्राने दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये 'हिचकी' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग 31 मार्च 2018 रोजी होणार आहे. या चित्रपटात राणी एक शिक्षकेची भूमिका साकारणार आहे. राणीच्या हिचकी सिनेमाने ५ दिवसात केली इतकी कमाई !
'हिचकी' चित्रपटामध्ये राणी मुखर्जी एका शिक्षकेची भूमिका साकारते. 'टौरेट सिंड्रोम' या समस्येशी तिचा झगडा सुरू असतो. या समस्येवर मात करून तिला शिक्षक होण्याचं तिचं स्वप्न साकारायचं असतं. या चित्रपटात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नातेसंबंधावर आधारित कहाणी आहे. या चित्रपटात राणी साकारत असलेल्या भूमिकेचं नाव 'नैना' आहे.
राणी मुखर्जीने या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. दर्शकांचे प्रेम आणि आशिर्वाद याबाबत तिने आभार व्यक्त केले आहेत.