किंग खानच्या पार्टीत मॅचिंग ड्रेसमध्ये पोहोचले रणवीर-दीपिका

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने त्याचा खास मित्र काजल आनंदच्या वाढदिवशी त्याच्या घरी एक पार्टी ठेवली होती.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 13, 2018, 06:20 PM IST
किंग खानच्या पार्टीत मॅचिंग ड्रेसमध्ये पोहोचले रणवीर-दीपिका title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने त्याचा खास मित्र काजल आनंदच्या वाढदिवशी त्याच्या घरी एक पार्टी ठेवली होती.

शाहरूखच्या या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. या पार्टीमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे मॅचिंग ड्रेसमध्ये पोहोचले.

या पार्टीमध्ये दीपिका पदुकोणने ब्लू रिप्ड जिंसवर पिवळा जॅकेट घातला होता. रणवीर आणि दीपिका एकाच गाडीत पार्टीला आले.

खूप दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. लवकरच दोघे लग्न करणार असल्य़ाच्या चर्चा आहेत. या दोघांनी गोवामध्ये एक अलीशान घर देखील खरेदी केलं आहे.

या दोन्ही कलाकारांनी एकत्र श्रीलंकेमध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं. या दरम्यान देखील दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या होत्या.