रणबीर कपूर VS रणवीर सिंह : कोण आहे 2018 चा बेस्ट अॅक्टर?

कोण पटकावणार हा किताब... 

रणबीर कपूर VS रणवीर सिंह : कोण आहे 2018 चा बेस्ट अॅक्टर?  title=

मुंबई : रणवीर सिंह आणि रणबीर कपूर बॉलिवूडमधील असे दोन कलाकार ज्यांच्या कामाची नेहमीच चर्चा होते. कॅरेक्टर पकडण्यात हे दोघे उत्तम कलाकार. रणबीर कपूरची सध्या त्याच्या 'संजू' या सिनेमामुळे जोरदार चर्चा रंगली आहे तर रणवीर सिंहने 'पद्मावत' सिनेमात साकारलेला अल्लाउद्दीन खिलजी सगळ्यांच्याच लक्षात राहिला. असं सगळं असताना आता सोशल मीडियावर या दोघांमध्ये तुलना केली जात आहे. मात्र रणबीर कपूर स्वतः या तुलनेबाबत काय म्हणतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाच आहे. 

अनेक चाहते आणि क्रिटिक्स आतापासून 2018 च्या बेस्ट अॅक्टरबद्दल चर्चा करत आहे. आणि आता ही तुलना रणबीर कपूर आणि रणवीर सिंहमध्ये होत आहे. या दोघांपैकी कोण हा मानाचा बेस्ट अॅक्टरचा किताब जिंकेल यावर जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या सगळ्यावर रणबीर कपूर स्वतः बोलला आहे. या तुलनेला रणबीर खूप सकारात्मकपणे घेत आहे. 

संजय लीला भन्सालीच्या 'पद्मावत' या सिनेमातील खिलजीची भूमिका खूप चर्चेत राहिली. रणवीर सिंहने साकारलेलं हे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. या भूमिकेची भरपूर चर्चा झाली. मात्र आता 'संजू' रिलीज झाल्यानंतर मात्र कुठेतरी ही भूमिका विसरून प्रेक्षक 'संजू' साकारणाऱ्या रणबीर कपूरची चर्चा करत आहे. सगळ्यांकडूनच रणबीर कपूरची जोरदार चर्चा रंगली आहे.