Ranveer Singh ने 'या' बॉलिवूड कपलचं रिलेशनशिप केलं कन्फर्म

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टने आपले अनेक सिक्रेट सांगितले.

Updated: Jul 8, 2022, 07:34 PM IST
Ranveer Singh ने 'या' बॉलिवूड कपलचं रिलेशनशिप केलं कन्फर्म  title=

मुंबई : 'कॉफी विथ करण' सीझन 7 चा पहिला एपिसोड गुरुवारी पार पडला. या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टने आपले अनेक सिक्रेट सांगितले. विशेष म्हणजे रणवीरने तर बॉलिवूडमधल्या एका कपलच्या रिलेशनशिपचा उलगडा केला आहे. त्यामुळे हे कलप कोणत हे ते जाणून घेऊयात.  

 रणवीर सिंग आणि आलिया भट्टने करणच्या शोमध्ये स्वतःच्या प्रेमकथेसंबंधित अनेक खुलासे केले आहेत. यासोबतचं रणवीरने बॉलिवूडमधल्या एका यंग कपलची प्रेमकथाही उघड केली आहे. एका चर्चेत रणवीर सिंगने सनी कौशल शर्वरी वाघला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे. 

काय म्हणाला रणवीर?
रणवीरला शोमध्ये एक प्रश्न विचारला की, कतरिना आणि विकीला कोणासोबत डबल डेटवर जायचे आहे. यावर रणवीरने सनी आणि शर्वरी यांची नावे घेतली. त्यामुळे रणवीरने खरंच हे बोलून त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

खरचं आहेत का रिलेशनशिपमध्ये ? 
सनी कौशल आणि शर्वरी वाघ एकमेकांना गुप्तपणे डेट करत असल्याची बातमी बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत पण त्यांना ही गोष्ट कळू द्यायची नाही. ही चर्चा त्या दिवसापासुन पुढे आली जेव्हा शर्वरीने कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लावली होती. बॉलिवूडमधील काही निवडक लोकांना आमंत्रित केलेल्या लग्नात शर्वरीचा समावेश होता. तर तिने नुसती हजेरी लावली नाही तर प्रत्येक विधीमध्ये तिने उत्साहाने भाग घेतला. कतरिनाच्या भावानेही पोस्ट करून शर्वरीचे कौतुकही केले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.