रणवीर सिंगच्या चाहत्यांना मोठा धक्का; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

 रणवीर लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Nov 4, 2022, 04:37 PM IST
रणवीर सिंगच्या चाहत्यांना मोठा धक्का; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? title=

Ranveer Singh YRF : बॉलिवूडमध्ये कधीच काहीच कायमसाठी नसतं. ईथे नाती लवकर बदलतात. आज आम्ही बोलत आहोत अभिनेता रणवीर सिंहबद्दल. ज्याने YRF टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीला अलविदा म्हटलं आहे. एका वृत्तानुसार रणवीरने YRF सोबतच आपलं 12 वर्षाचं आपलं नातं संपवलं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, रणवीरने यशराज फिल्म्सच्या प्रोडक्शनमध्ये मनीष शर्माच्या 'बँन्ड बाजा बारातमधून 2010 मध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता.  

YRF नेहमी रणवीरसाठी दुसरं घर राहिल 
सुत्रांनुसार, YRF नेहमी रणवीरसाठी त्यांचं दुसरं घरं राहिलं. कारण त्याच्या करिअरचं क्रेडिट प्रोडक्शन हाऊसला जातं. सुत्रांनुसार, रणवीर आणि YRF 12 वर्ष एकत्र होते, आता अभिनेत्याला पुढे जायचं होतं." विशेष म्हणजे रणवीरला फक्त YRF ने ग्रूम केलं होतं. रणवीर सिंगचा मित्र आणि मार्गदर्शक आदित्य चोप्रासोबत त्याचे जवळचं नातं आहे. त्यामुळे त्यांच्यात कोणतेही गैरसमज नव्हते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिणितीने देखील सोडलं YRF टॅलेंट
आम्ही तुम्हाला सांगतो की, याआधी अभिनेत्री परिणितीने चोप्राने YRF टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीची साथ सोडली होती. परिणिती सिनेमात काम करण्याआधी YRF टॅलेंटमध्ये पीआर मार्केटिंगचं काम करत होती. (Ranveer Singh left the support of YRF talent for 12 years Planning to move on with new agency)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीर सिंगचं वर्कफ्रंट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने नवीन एजन्सी शोधण्यास सुरुवात केली असून येत्या आठवड्यात तो याबाबत निर्णय घेऊ शकतो. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणवीर लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरची दुहेरी भूमिका असून दीपिका पदुकोणही त्याच्यासोबत आहे. याशिवाय त्याच्याकडे आलिया भट्टसोबत 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' देखील आहे.