गर्दीत हरवलेल्या चिमुकल्याचे Ranveer Singh ने वाचवले प्राण... Video Viral

Ranveer Singh: लहान मुलांवर असलेलं रणवीरचं प्रेम अखेर समोर आलच... गर्दीत हरवलेल्या चिमुकल्यासाठी धावून आला अभिनेता... Video Viral   

Updated: Dec 13, 2022, 06:47 PM IST
गर्दीत हरवलेल्या चिमुकल्याचे Ranveer Singh ने वाचवले प्राण... Video Viral  title=

Ranveer Singh New Video : अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईत...अनेक सुपरहिट चित्रपटामुळे रणवीरची एनर्जाटिक बॉय (Energetic Boy) म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.  रणवीर फक्त अभिनय आणि सिनेमांमुळेच नाही तर अन्य कारणांमुळे देखील कायम चर्चेत असतो. कधी अभिनेत्री दीपिकावर ( Deepika Padukone ) असलेलं प्रेम, तर कधी विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असलेला रणवीरवर सध्या प्रेमाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीरच्या कडेवर एक चिमुकला दिसत आहे. 

रणवीर नुकताच मुंबईत असलेल्या एका कार्यक्रमात पोहोचला. त्याठिकाणी रणवीरची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. अभिनेत्याला पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमध्ये एक चिमुकला हरवला आणि प्रचंड रडत होता. चिमुकल्याला रडताना पाहून रणवीर व्याकूळ झाला आणि अभिनेत्याने चिमुकल्याला कडेवर घेवून गर्दीतून बाहेर काढलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये, 'Awww... किती गोड...', तर अन्य एका युजरने कमेंटमध्ये 'लव्ह यू हिरो...' असं लिहिलं आहे. 

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा
रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'सर्कस' (Circus) सिनेमातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 23 डिसेंबर रोजी रणवीरचा 'सर्कस' रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

वाचा | माईक नाही, बंदूक हाती घेणार BTS फेम गायक; करणार लष्करात प्रवेश 

 

'सर्कस'मध्ये रणवीर सिंगची दुहेरी भूमिका चाहत्यांना पाहता येणार आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अभिनेत्री पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय देवगण आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे. सध्या सर्वत्र रणवीरच्या 'सर्कस' सिनेमाची चर्चा रंगत आहे. (Circus film)