VIDEO : दीपिकासमोर रणवीर सिंहचा टेबल डान्स

पाहा हा व्हिडिओ

VIDEO : दीपिकासमोर रणवीर सिंहचा टेबल डान्स  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर फक्त आपल्या अभिनयासाठीच नाही तर एनर्जी करता देखील लोकप्रिय आहे. आणि जर अशावेळी कोणत्या पार्टीच निमित्त चालून आली तर रणवीर सिंह मागे कसे राहिल. याबाबतीतले अनेक पुरावे आपल्यासमोर आले आहेत. अगदी रणवीर सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या रिस्पेशनमध्ये देखील डान्स करताना दिसला. रणवीर सिंहचा आणखी असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत रणवीर सिंह दीपिका पदुकोणच्यासमोर टेबलवर चढून डान्स करताना दिसत आहे. रणवीर सिंहची बहिण रितिकाचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त असलेल्या पार्टीत दीपिका पदुकोणदेखील होती. या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये रणवीर सिंह मस्त धमाल करताना दिसत आहे. 

एका व्हिडिओत रणवीर सिंह आपल्या बहिणीसाठी गाणी गाताना दिसत आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोणसहीत उपस्थित सर्व लोक टाळ्या वाजवून रणवीरला प्रोत्साहन दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओवर सगळीजण बॉलिवूड साँगवर डान्स करताना दिसत आहेत. 

या व्हिडिओत रणवीर सिंह डान्स करताना अचानक टेबलवर चढतो आणि 'दिल धडकने दो' च्या गाण्यावर 'मैं डालूं ताल पर भंगडा' या गाण्यावर डान्स केला आगे. तसेच त्यानंतर ऋषी कपूरच्या 'बोलो ओम शांती ओम'या लोकप्रिय गाण्यावर देखील डान्स केला आहे.