रणवीर सिंगने चार्ली चॅपलिन यांना दिली आदरांजली...

 अभिनेता रणवीर सिंग नेहमी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो.

Updated: May 2, 2018, 10:48 AM IST
रणवीर सिंगने चार्ली चॅपलिन यांना दिली आदरांजली... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो आणि प्रत्येक भूमिकेतून आपल्या चाहत्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. यातूनच त्याच्यातील कलेची जाणीव होते. रणवीरचा हॅप्पी गो लकी अंदाज सर्वांनाच भावतो. अलिकडेच त्याच्या कलेची प्रचिती देणारे व्हिडिओज त्याने शेअर केले आहेत. या व्हिडिओतून रणवीर सिंग, चार्ली चॅपलिनला आदरांजली देत आहे.काम संपवून सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रणवीर स्विटजरलॅंडला गेला आहे. तेथूनच त्याने काही व्हिडिओज शेअर केले आहेत. व्हिडिओत रणवीर चार्ली चॅपलिनच्या अवतारात दिसत आहे. त्यात तो चार्ली चॅपलिनची अॅक्टींग करताना दिसत आहे.  

रणवीर सिंग चार्ली चॅपलिनच्या वेशात...

 

“A tramp, a gentleman, a poet, a dreamer, a lonely fellow, always hopeful of romance and adventure.” - Charlie Chaplin #ChaplinsWorld #inLOVEwithSWITZERLAND @chaplins.world @montreuxriviera @myswitzerlandin @myvaud

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरने अलिकडेच जोया अख्तरचा सिनेमा गली बॉयचे शूटिंग पूर्ण केले. लवकरच रोहित शेट्टीच्या सिम्बा सिनेमाच्या शूटिंगला रणवीर सुरुवात करेल. या सिनेमात रणवीरसोबत सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसेल.