83 Box Office : तिसऱ्याच दिवशी '`83' ची ही काय अवस्था; जाणून घ्या चित्रपटाच्या कमाईचे नवे आकडे

चित्रपट काहीसा गटांगळ्या खाताना दिसत आहे.   

Updated: Dec 28, 2021, 03:20 PM IST
83 Box Office : तिसऱ्याच दिवशी '`83' ची ही काय अवस्था; जाणून घ्या चित्रपटाच्या कमाईचे नवे आकडे  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग, पंकज त्रिपाठी आणि सहकलाकारांचा तगडा अभिनय असणाऱ्या '`83' या चित्रपटाची कमाई नेमकी किती असणार याचीच उत्सुकता सिनेरसिकांपासून समीक्षकांना लागली होती. तगडं कथानक, तितकीच भलीमोठी स्टारकास्ट आणि सारंकाही योग्य असलं, तरीही चित्रपट काहीसा गटांगळ्या खाताना दिसत आहे. 

पहिल्या सोमवारपर्यंत, म्हणजेच प्रदर्शनानंतर चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा फारसा समाधानकारक नाही. 

नोकरदार वर्गाचा कामाचा आठवडा सुरु झाल्यामुळं आकड्यांमध्ये घट होणं अपेक्षित होतं. पण, कमाईचा आकडा एकेरी असणं ही बाब मात्र काहीशी धास्तावणारी ठरत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारच्या दिवशी चित्रपटानं 7 कोटींचा गल्ला जमवला आहे. निर्मात्यांकडून येणारे आकडे अद्यापही प्रतीक्षेत आहेत. 

चार दिवसांपर्यंत या चित्रपटानं 50 कोटींचा आकडा ओलांडला आहे. पण, पुढची वाट मात्र काहीशी अडथळ्यांची दिसत आहे. 

चार दिवसांपर्यंत या चित्रपटानं अवघ्या 53 कोटींचाच गल्ला जमवला आहे. 

भारतामध्ये हा चित्रपट 24 डिसेंबरला जवळपास 374 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. 

तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं  पहिल्याच दिवशी 12.64 कोटी रुपयांची कमाई केली. 

दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 16.95 कोटी इतका होता. तर रविवारी हा आकडा 17.41 इतका होता. 

परिणामी ओपनिंग विकेंडपर्यंत कमाई 47 कोटी इतकी झाली होती. परदेशी कमाईबाबत सांगावं तर, या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांमध्ये 26.16 कोटी रुपांची कमाई केली. 

चित्रपटापुढे कोणती आव्हानं? 
'पुष्पा' आणि 'द राईज ऑफ स्पायडरमॅन नो वे होम' या चित्रपटांचा सामना रणवीरच्या या चित्रपटाला करावा लागत आहे. त्यातच 31 जानेवारीला शाहिद कपूरचा 'जरसी' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. 

एकिकडे चित्रपटांचं आव्हान तर दुसरीकडे कोरोनाचा मारा या साऱ्याचा थेट परिणाम या '`83'ला करावा लागत आहे.