close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रॅपर बादशहा करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

 आपल्या पंजाबी गाण्यांनी जगभरातील चाहत्यांना वेढ लावणार रॅपर बादशाहा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Updated: Feb 12, 2019, 12:23 PM IST
रॅपर बादशहा करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

मुंबई: आपल्या पंजाबी गाण्यांनी जगभरातील चाहत्यांना वेढ लावणार रॅपर बादशाहा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. डीजे वाले बाबू, अभी तो पार्टी शुरू हुई यांसारख्या अनेक गाण्यांचा गायक आता अभिनय क्षेत्रात पाय ठेवणार आहे. सिनेमात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत झळकणार असून रॅपर बादशहा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सिनेमात एकत्र दिसणार आहेत. आजपासून सिनेमाच्या शूटिंगचा प्रारंभ झाला असल्याची माहिती खुद्द ट्रेड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक शिल्पी दासगुप्ता यांच्या खांद्यावर असून हा दिग्दर्शन क्षेत्रात त्यांचा पहिलाच अनुभव आहे. बादशाह, सोनाक्षी सिन्हा यांच्या व्यतिरिक्त वरुण शर्मा, अन्नू कपूर, नादिरा बब्बर आणि कुलभुषण खरबंदा अशी तगडी स्टरकास्ट सिनेमात असणार आहे.

 

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सिनेमाची कथा ही थोडी-फार बादशहाच्या आयुष्यावर आधारित आहे, सध्या सिनेमाची शूटिंग पंजाबमध्ये सुरु असून बादशहा चालू वर्षात निर्मिती क्षेत्रातही डेब्यू करणार आहे. सिनेमाचे नाव काय असेल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

बादशहाने त्याच्या करियरची सुरुवात गायक हनी सिंग सोबत 2006 साली केली होती. 2012 साली आलेल्या 'कर गई छुस' या गाण्यामुळे बादशहा प्रकाश झोतात आला. त्यानंतर 2016 साली आलेल्या 'कपूर ऍन्ड सन्स' सिनेमाच्या माध्यमातून गाण्याला प्रसिद्धी मिळाली.