'बात क्यों नही करते मुझसे?', चारचौघात कोणाला प्रेमळ विनवणी करतेय Rashmika Mandanna

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्या  व्हिडीओत रश्मिका विमानतळावर असणाऱ्या काही पापाराझींशी बोलताना दिसत आहे. 

Updated: Sep 16, 2022, 02:13 PM IST
'बात क्यों नही करते मुझसे?', चारचौघात कोणाला प्रेमळ विनवणी करतेय Rashmika Mandanna  title=
Rashmika Mandanas conversation with paparazzi goes viral watch video

Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटांमुळे, त्यात केलेल्या अभिनयामुळे किंवा डायलॉग डिलिव्हरीमुळे ती नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' (Pushpa)

चित्रपटातील अभिनयामुळे बॉलावूडच्या प्रेक्षकांवरही तिची भुरळ पडली.  अभिनयाव्यतिरिक्त  रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तिच्या गोड हसण्यासाठी आणि नवनवीन लूकसाठीही सातत्यानं चर्चेत येऊ लागली. या सगळ्यामध्ये तिच्या खासगी

आयुष्याच्याही तितक्याच चर्चा झाल्या. 

रश्मिका कोणाला डेट करतेय इथपासून तिच्या आयुष्यात खास जागा असणारा 'तो' आहे तरी कोण, इथपर्यंतही चर्चा झाल्या. त्यातच आता या अभिनेत्रीचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथं ती कोणालातरी विनवणी करताना दिसत आहे. 

नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली

कोणाला म्हणतेय, 'बात क्यों नही करते मुझसे?'

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्या  व्हिडीओत रश्मिका विमानतळावर असणाऱ्या काही पापाराझींशी बोलताना दिसत आहे. 

'बात क्यों नही करते मुझसे?', असं म्हणत ती त्यांच्याशी हक्कानं बोलताना दिसत आहे. पापाराझींकडे (Paparazzi) तक्रारही करताना दिसत आहे. 'पुष्पाम'धील या 'श्रीवल्ली'चा अदांज तिच्या चाहत्यांना खुप आवडला. सोशल मीडियावर (Social Media)

तिच्या या व्हिडीओला अनेक लाईक्सही मिळत आहेत. तर काही नेटकरी त्यावर कमेंट्सही करताना दिसत आहेत. 

व्हिडीओत रश्मिका पापाराझीला विचारते की 'तुम्ही माझ्याशी का बोलत नाही आहात?' त्यावर पापाराझी उत्तर देतात की 'तुम्ही इंग्रजी मध्ये बोलता, हिंदीमध्ये बोला'. त्यानंतर रश्मिका हसून बोलते की 'ठीक आहे हिंदी मध्ये बोलायचं ?'

रश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

साउथ क्वीन 'रश्मिका मंदाना' (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्येही (Bollywood) पदार्पण करणार आहे. 'गुडबाय' या चित्रपटात रश्मिका अमिताभ बच्चनयांच्यासोबत (Amitabh Bachchan) दिसणार आहे. 7 ऑक्टोबरला हा चित्रपट

चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री 'नीना गुप्ता' (Neena Gupta) चित्रपटात रश्मिकाच्या आईची भुमिका साकारताना दिसणार आहेत.