फक्त टी-शर्ट घालून घराबाहेर पडली नॅशनल क्रश

साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रश म्हटलं जातं.

Updated: Nov 15, 2021, 06:22 PM IST
फक्त टी-शर्ट घालून घराबाहेर पडली नॅशनल क्रश title=

मुंबई : साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रश म्हटलं जातं. तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा लाइक केले जातात. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती लांब टी-शर्ट घातलेली दिसत आहे. त्यामुळे ती ट्रोल झाली होती.

लांब टी-शर्टमुळे ट्रोल 
साऊथ सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना लांब टी-शर्ट घालून शॉपिंगला पोहोचली. ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना लांब टी-शर्टमध्ये दिसत आहे. ज्यामुळे चाहते तिला ट्रोल करत आहेत. चाहते रश्मिका मंदान्नाच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि लिहितायेत की, ती पॅंट घालायला विसरली आहे? साऊथची क्वीन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्नाची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या क्युट एक्सप्रेशनमुळे ती अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलिवूडमध्ये पदार्पण
रश्मिका मंदान्नाने 2016 मध्ये कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'मधून पदार्पण केलं. ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट 1970 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.