रवीना टंडनने फक्त कपड्यांमुळे नाकारला होता शाहरुखचा चित्रपट, म्हणाली होती विचित्र...

रवीना टंडनने अनेक वेळा अभिनेता शाहरुख खानसोबत काम केलं आहे. मात्र, तिने एकदा फक्त कपड्यांमुळे शाहरुख खानचा चित्रपट नाकारला होता. कारण काय? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 10, 2024, 04:35 PM IST
रवीना टंडनने फक्त कपड्यांमुळे नाकारला होता शाहरुखचा चित्रपट, म्हणाली होती विचित्र... title=

Raveena Tandon : अभिनेत्री रवीना टंडनची गणना 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये केली जाते. शाहरुख खानसोबत रवीना टंडनने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ती संजय दत्तसोबत एका चित्रपटामध्ये रोमान्स करताना दिसणार आहे. दरम्यान, रवीना टंडनने एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. तिने शाहरुख खानचा एक चित्रपट नाकारला होता. असं तिने म्हटलं आहे. 

अभिनेत्री रवीना टंडनने शाहरुख खानसोबत एक नाहीतर तीन चित्रपटात काम केलं आहे. दोघांना 'ये लम्हे जुदाई के' आणि 'जमाना दीवाना'  यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. वर्षानुवर्षे एकत्र काम करून देखील अभिनेत्री रवीना टंडने एका कारणामुळे शाहरुख खानचा चित्रपट नाकारला होता. 

काय आहे कारण? 

शाहरुख खानसोबत एका चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेत्री रवीना टंडन तयार होती. ती हा चित्रपट साईनही करणार होती. पण जेव्हा तिला वेशभूषेबद्दल कळले तेव्हा तिने चित्रपट करण्यास नकार दिला. पोशाख अतिशय विचित्र होते. मला ते परिधान करणे सोयीचे नव्हते. मला वाटले की ते खूप आक्षेपार्ह आहे. म्हणून मी म्हणाले, 'माफ करा, मी करू शकत नाही'. असं तिने एका दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मात्र, रवीना टंडनने शाहरुख खानचा कोणता चित्रपट नाकारला याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. 

रवीना टंडनने हा चित्रपट नाकारल्याने शाहरुख खान देखील हैराण झाला होता. रवीना म्हणाली की, शाहरुख खरा सज्जन आहे. शाहरुख म्हणाला तू वेडी आहेस का? आता हे सगळं का बोलताय? कारण आम्ही अप्रतिम संगीत असलेला 'जादू' चित्रपट करत आहोत. आम्ही 'जमाना दीवाना' ही करतोय. शाहरुख हा सर्वात बुद्धिमान आणि सौम्य सहकलाकारांपैकी एक आहे. मी त्याला सांगितले की मी ते कपडे घालू शकत नाही. मला विचित्र वाटले.