'अभिनेत्याला एका चित्रपटासाठी जितका पैसा मिळायचा, तितका आम्हाला...'; इंडस्ट्रीविषयी रवीना टंडनचा खुलासा

Raveena Tandon on inequlity in industry : रवीना टंडननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील असमानते विषयी वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 17, 2024, 05:10 PM IST
'अभिनेत्याला एका चित्रपटासाठी जितका पैसा मिळायचा, तितका आम्हाला...'; इंडस्ट्रीविषयी रवीना टंडनचा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Raveena Tandon on inequlity in industry :  बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही 90 च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रवीनानं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तर रवीना ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. रवीना नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावर स्पष्ट बोलते. दरम्यान, आता रवीनानं चित्रपटसृष्टीतील काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

रवीनानं ही मुलाखत 'इंडियन एक्सप्रेस'ला दिली आहे. तिनं म्हटलं की "90 च्या दशकात मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी तिला एका विचारसरणीशी लढावं लागलं. ती चित्रपटात स्टीरियोटाइप होऊ लागली होती. तिनं म्हटलं की 90 च्या दशकात अशी परिस्थिती होती की अभिनेत्रींना त्यांच्या करिअरसाठी प्लॅनिंग करण्याची संधी मिळत नव्हती. अभिनेत्रींना त्यांना काय करायचं आहे आणि काय नाही करायचं या गोष्टीची निवड करण्याची ही संधी खूप कमी होती." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एकावेळी एक नाही तर 10-12 चित्रपटांमध्ये करायचे काम

रवीना पुढे म्हणाली की "जेव्हा आमच्या करिअरच्या सुरुवातीला आम्ही एकावेळी एका चित्रपटात काम करत नव्हतो. आम्ही एकत्र 10 ते 12 चित्रपटांमध्ये काम करायचो. काही चित्रपटांविषयी असं म्हटलं जायचं की जर त्यात कोणता मोठा कलाकार आणि मोठा दिग्दर्शक आहे तर चित्रपट सुपरहिट होतो. त्यावेळी चित्रपटांसाठी जास्त ऑपश नसायचे." 

अभिनेत्रींना मिळायचे नाही जास्त मानधन

रवीना टंडननं म्हटलं की "त्यावेळी अभिनेत्रींना जास्त पैसे मिळत नव्हते. एक अभिनेता एक चित्रपटातून जितके पैसे कमवायचा, तितंक एक अभिनेत्री 15 ते 16 चित्रपट कमावल्यानंतर कमवू शकत होती. हे यामुळे झालं की कारण आम्हाला तिथे स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी वेळ लागला. जेव्हा चित्रपट प्रदर्शित व्हायचे, ज्यात 6 सुपरहिट गाणी आणि तेच ते एकासारखे एक सीन असायचे आणि आणखी चित्रपटांच्या ऑफर मिळू लागायच्या. अशा वेळी डोळे बंद करुन या चित्रपटांना साइन करण्यात यायच्या. करियर प्लॅनिंग या नावाची कोणती गोष्ट नव्हती." 

हेही वाचा : 'चांगल दिसणं म्हणजे...', प्रियामणीचं चित्रपटसृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य, तुम्हाला हे पटतंय का? 

रवीना आताच्या काळाविषयी बोलत असताना दीपिका पदुकोणचा उल्लेख केला. रवीना म्हणाली " 'ओम शांति ओम' नंतर पाच-सहा चित्रपट केल्यानंतर दीपिकाला 'बाजीराव मस्तानी' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिला तशा प्रकारचं काम करण्याची संधी मिळाली, जसं तिला करायचं होतं. आम्हाला आमच्या आवडीची काम करण्याची संधी खूप उशिरा मिळायची. त्यामुळे सुरुवातीला 20 चित्रपट करावे लागायचे."