झहीरमुळेच सोनाक्षी विकतीये मुंबईतील घर, खरं कारण आलं समोर, मित्र म्हणाला 'त्याच्या घरच्यांचा...'

झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) मुंबईतील आलिशान घर विकायला काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान सोनाक्षीच्या या निर्णयामागील खरं कारण समोर आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2024, 05:06 PM IST
झहीरमुळेच सोनाक्षी विकतीये मुंबईतील घर, खरं कारण आलं समोर, मित्र म्हणाला 'त्याच्या घरच्यांचा...' title=

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) 2023 मध्ये मुंबईतील वांद्रे पश्चिममधील (Bandra West) आपलं आलिशान घर विकायला काढलं आहे. याच घऱात सोनाक्षी आणि झहीरचा विवाहसोहळा पार पडला होता. हेच घऱ सोनाक्षीने विकायला काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोनाक्षीचं घर विकण्यासाठी रिअल इस्टेटने जाहिरात टाकली आहे. 4200 स्क्वेअर फुटांच्या या घराची किंमत 25 कोटी ठेवण्यात आली आहे. दरम्यान सोनाक्षीचं घर विकण्यामागे नेमकं काय कारण आहे यासंबंधी ETimes ने वृत्त दिलं आहे. अभिनेत्रीच्या निकटवर्तीयाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे.

सोनाक्षी मोठं घर खरेदी कऱणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी घर विकण्यामागे झहीरच कारण आहे. झहीरचं कुटुंब बांधकाम व्यावसायात आहे. निकटवर्तीयाने सांगितल्यानुसार, "सोनाक्षीने मोठं घर खरेदी केलं आहे. सोनाक्षीने ज्या इमारतीत घर घेतलं आहे ती झहीरच डेव्हलप करत आहे".

रिअल इस्टेट कंपनीने इंस्टाग्रामला सोनाक्षीच्या घराचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ती घऱ विकत असल्याचं उघड झालं होतं. या व्हिडीओत एजंटने संपूर्ण घऱ दाखवलं असून पोस्टमध्ये झहीर इक्बाललाही टॅग केलं आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये, अपार्टमेंटचे वर्णन प्रतिष्ठित 81 ऑरिएट बिल्डिंग, वांद्रे रेक्लेमेशन मधील आलिशान सी-फेसिंग व्ह्यू असं केलं आहे. 

पोस्टमध्ये या अपार्टमेंटची माहिती देण्यात आली आहे. त्यात लिहिण्यात आलं आहे की, 4200 चौरस फूट सी-फेसिंग अपार्टमेंट मूळत: 4 BHK होते. ते डेकसह प्रशस्त 2 BHK मध्ये रूपांतरित करण्यात आहे, हे अपार्टमेंट पूर्णपणे सुसज्ज आहे आणि अनेक आधुनिक सुविधांसह उपलब्ध आहे. या अपार्टमेंटची किंमत 25 कोटी रुपये आहे. सोनाक्षीने या पोस्टला लाईक केलं आहे. सोनाक्षीच्या घरात एक आर्ट स्टुडिओ, योग एरिया, ड्रेसिंग रूम आणि वॉर्डरोब आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये सोनाक्षीने वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे पश्चिम येथील 81 ऑरिएटच्या 26 व्या मजल्यावर अपार्टमेंट विकत घेतला. सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यांनी घराच्या करारावर सही केली आहे. करारात दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटचे चटईक्षेत्र 4,210.87 चौरस फूट आहे आणि त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. सी-फेसिंग व्ह्यू असणाऱ्या या घऱातून माहीम खाडी आणि वांद्रे-वरळी सी-लिंक दिसतो. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x