दुसरं लग्न करण्याआधी मुलांना काय सांगितलं? सलीम खान यांनी केला खुलासा 'तुम्हाला आता...'

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान (Salim Khan) यांनी यांनी दोन लग्न केलं आहेत. सलमा खान (Salma Khan) यांच्याशी पहिलं लग्न केल्यानंतर हेलना (Halen) यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2024, 04:05 PM IST
दुसरं लग्न करण्याआधी मुलांना काय सांगितलं? सलीम खान यांनी केला खुलासा 'तुम्हाला आता...' title=

1970 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथा लेखक सलीम खान (Salim KHan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलण्यात मोलाची भूमिका बजावली.  प्राइम व्हिडिओवरील 'अँग्री यंग मेन' (Angry Young Men) या सीरिजच्या माध्यमातून दोघांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील अनेक नवे पैलू यानिमित्ताने समोर येणार आहेत. दरम्यान एका एपिसोडमध्ये मुलाखतकाराने सलीम खान (Salim Khan) यांना हेलन (Helen) यांच्या प्रेमात तुम्ही कसे पडलात? अशी विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, "जर तुम्ही कधी प्रेम केलं असेल तर तुम्हाला समजेल". यावेळी त्यांनी आपण मुलांना कशाप्रकारे दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं याचाही खुलासा केला. 

"मी सर्व मुलांसह बसून चर्चा केली. मी त्यांनी सांगितलं की, तुम्हाला हे आता समजणार नाही, पण जेव्हा मोठे व्हाल तेव्हा समजेल. मी हेलन आंटीच्या प्रेमात आहे. मला माहिती आहे की, तुम्ही तिच्यावर आईवर करता तेवढं प्रेम करु शकत नाही. पण तुम्ही तिला तोच आदर द्यावी अशी माझी अपेक्षा आहे," असा खुलासा सलीम खान यांनी केला आहे.

दुसरीकडे अरबाज खाननेही आपली आई सलमा खानने कधीच आम्हाला वडील सलीम खान आणि हेलन यांच्याबद्दल वाईट विचार करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी प्रभावित केलं नसल्याचं सांगितलं होतं. "तिच्याकडे स्वत:च्या समस्या होत्या, पण तिने कधीच आम्हाला कधीच तुमचे वडील असे आहेत किंवा ते काय करत आहेत अशा गोष्टी विचार करण्यास भाग पाडलं नाही. आम्ही त्यांना आईप्रमाणे वागणूक देत असलो तरी हेलन आंटी म्हणून हाक मारतो. त्या आमच्या आयुष्याचा भाग आहेत. आमच्यापेक्षा जास्त आमची आई त्या प्रत्येक गोष्टीचा भाग असतील याची काळजी घेते," असं अरबाजने सांगितलं.

हेलन यांनी 1981 मध्ये सलीम खान यांच्याशी लग्न केलं. 1958 मध्ये हावडा ब्रिज चित्रपटातील 'मेरा नाम चिन चिन छू' गाण्यातून त्यांना ब्रेक मिळाला होता. मेहबूबा मेहबूबा आणि ये मेरा दिल यांसारख्या हिट ट्रॅकमध्ये त्यांनी काम केलं आहे.