'साथीदाराची Privacyही तितकीच महत्त्वाची'

ब्रेकअपच्या प्रश्नांवर अभिनेत्रीचं उत्तर

Updated: Nov 18, 2019, 12:27 PM IST
'साथीदाराची Privacyही  तितकीच महत्त्वाची'
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अनेकदा खासगी आयुष्यातील विविध प्रसंगांविषयी बोलणं सेलिब्रिटी टाळतात. त्यामागे प्रत्येक सेलिब्रिटीचं आपलं असं वेगळं कारण असतं. असंच कारण अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिनेही सर्वांसमोर ठेवलं आहे. 'रुस्तम' या चित्रपटातून खिलाडी कुमारसोबत झळकणाऱ्या इलियाना Ileana D'Cruz आणि तिचा प्रियकर अँड्य्रू निबोन Andrew Kneebone यांच्या नात्यात दुरावा आला आहे. 

काही दिवसांपूर्वीच त्या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर आणि एकमेकांसोबतच्या सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केल्यानंतर याविषयीच्या चर्चा आणखी ठळक होऊ लागल्या. ज्यानंतर इलियानाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागला. मुळात जोडीदार असणं ही भावनाच किती सुखद असते याचा उलगडा इलियायाने एका मुलाखतीत यापूर्वीच केला होता. त्याचवेळी मानसिक शांतताही तितकीच महत्त्वाची असल्याची बाबही तिने अधोरेखित केली होती. 

'पिंकव्हिला'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा तिने खासगी जीवनात आलेल्या या वळणाविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्यासाठी ही एक बाब स्पष्ट होती की, जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात, विशेषत: रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा फक्त तुम्हीच त्या नात्यात नसता. तेव्हा दोन व्यक्ती त्या नात्यात असतात. तांत्रिकदृष्ट्या म्हणावं तर, तुम्ही त्या व्यक्तीविषयीसुद्धा बोलत असता आणि जे योग्य नसतं. मुळात सातीदाराची गोपनियताही तितकीच महत्त्वाची असते', असं तिने स्पष्ट केलं. मी सर्व नकारात्मक गोष्टी आणि खिल्ली उडवली जाण्याचा सामना करत असेन त्यावेळी समोरच्या व्यक्तीचं नावही त्यात गोवलं जाणं चुकीचं आहे अशा शब्दांत तिने प्रियकरासोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्याविषयीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

अशा प्रसंगाचा सामना करत असताना आपल्याला कुटुंबाचं आणि जवळच्या मित्रपरिवाचं महत्त्व कळत असल्याचं म्हणज सर्वसामान्यांप्रमाणेच आपणही अशा प्रसंगांना तोंड दिल्याचं इलियाना म्हणाली.