Rhea Kapoor Accidentally Pushes Jitendra: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे चर्चा आहे ती म्हणजे Thank You For Coming या चित्रपटाची. या चित्रपटाची निर्मिती ही शोभा कपूर, एकता कपूर, अनिल कपूर, रिया कपूर यांनी केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो म्हणजे जितेंद्र यांचा. सध्या या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळी बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी या चित्रपटाच्या संपुर्ण स्टारकास्टनंही हजेरी लावली होती. त्यातून ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनीही यावेळी हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती.
प्रमियरला त्यांनी आणि अनिल कपूर यांनी दणक्यात एन्ट्री घेतली होती. अनिल कपूर आहेत 60 वर्षांचे आणि जितेंद्र आहेत 81 वर्षांचे. त्यामुळे त्यांनी घेतलेली एन्ट्री पाहून त्यांच्या फिटनेसचंही फार कौतुक होताना दिसतं आहे.
परंतु सध्या त्यांचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी या चित्रपटाची संपुर्ण टीम ही फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्ससमोर उभी होती. त्यावेळी जितेंद्रही उपस्थित होते. त्यावेळी रिया कपूर कोणाशीतरी बोलायला म्हणून जात होती तोच तिचा धक्का हा जितेंद्र यांना लागला. परंतु तो धक्का चुकून लागल्यामुळे ती त्यांची माफीही मागते. परंतु तिचा धक्का लागल्यानं जितेंद्र हे हलकेसे पडतात परंतु तेवढ्यातच ते सरळं उभेही राहतात. सध्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून रिया कपूरला ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे.
हेही वाचा : आमिर खानला पाहताच सलमान खाननं मारली मिठी अन् पुढे... पाहा VIDEO
अनेकांनी तिच्यावर फार टीका केली आहे. त्यांनी फार तिखट भाषेत तिला सुनावलं आहे. एकानं लिहिलंय की, 'किती बेशिस्त आहे...' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, 'ही काय पद्धत आहे एका वरिष्ठ अभिनेत्याशी वागायची?', त्याचसोबत त्यांनी रिया कपूरच्या अॅटिट्यूटवर टीकाही केली आहे. काहींनी असंही म्हटलंय की, तिनं धक्का मारला. ती सॉरी म्हणाली परंतु तिला माहितीच नव्हतं की ते जितेंद्र आहेत.' सध्या या व्हिडीओवरून बराच गदारोळ माजला आहे.
|
CYP
(20 ov) 136/8
|
VS |
AUT
140/3(16.3 ov)
|
| Austria beat Cyprus by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(20 ov) 136/8
|
VS |
NEP
140/3(16.3 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.