मुंबई : हॉलिवूडची सुपरस्टार गायिका आणि अब्जाधीश रिहाना आई झाली आहे. TMZ च्या रिपोर्टनुसार, 13 मे रोजी रिहानाने प्रियकर A$AP रॉकीच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लॉस एंजेलिसमध्ये रिहानाने चिमुकल्याचं जंगी स्वागत केलं आहे. रिहानाने लग्नापूर्वीचं बॉयफ्रेंडच्या मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदची बातमी दिल्यानंतर रिहाना आणि रॉकीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महत्त्वाचं म्हणजे गरोदरपणातही रिहाना फॅशन स्टेटमेंट द्यायला विसरली नाही. गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे रिहानाला टीकेचा सामना करावा लागला. पण, कशाचीही तमा न बाळगता, न्यूनगंडांना शह देत रिहानाने अनेकांची मनं जिंकली.
गरोदरपणात तिनं एका मासिकासाठी फोटोशूट केलं. त्यावेळी देखील तिने वेह-वेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. रिहाना आणि रॉकीच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी या दोघांनीही 2021 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. 2016 मध्ये रिहाना अखेरची एका अल्बममधून झळकली होती.