आलिया-रणवीरच्या नात्यावर ऋषि कपूरची प्रतिक्रीया

दोघांच्या नात्यासंबंधी रणवीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांची प्रतिक्रीया समोर आलीयं.

Updated: Jul 23, 2018, 12:54 PM IST
आलिया-रणवीरच्या नात्यावर ऋषि कपूरची प्रतिक्रीया

मुंबई : रणवीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या बुल्गारियामध्ये सिनेमाची शूटींग करत आहेत. 'ब्रम्हास्त्र' च्या सेटवर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे वृत्त होते. काही दिवसांपुर्वी तर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. तसतर अद्याप दोघांनीही खुलेआम आपल्या नात्याची कबुली दिली नाही. असं असलं तरीही मीडियासमोर आपल्या नात्याची हिंट देत राहतात. दोघांच्या नात्यासंबंधी रणवीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांची प्रतिक्रीया समोर आलीयं.

रणवीरने लग्न करायला हवं 

 आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या ऋषी कपूर यांनी मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, 'रणवीर कपूरला आता लग्न करायला हवं. मी २७ वर्षाचा असताना लग्न केलं होतं त्यामुळे रणवीरसाठी हा हाय टाईम आहे. तो आता ३५ वर्षांचा झालाय. त्यालाआवडेल त्या मुलीशी तो लग्न करू शकतो. आम्हाला त्याबद्दल काही तक्रार नाही. मरण्याआधी मला माझ्या नातवंडासोबत वेळ घालवू इच्छितो.'

'जे आहे ते सर्वांना माहितेय'

रणवीर आणि आलियाच्या नात्याबद्दलही ऋषि कपूर यांना यावेळी विचारण्यात आले. 'जे आहे ते सर्वांना माहितेय. मला याबद्दल काही बोलण्याची गरज नाही,' असे त्यांनी सांगितले. ऋषि कपूर सध्या आपला आगामी सिनेमा 'मुल्क'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. ३ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोयं.  या सिनेमात ऋषि कपूर, तापसी पन्नू, नीना गुप्ता, मनोज पहवा, आशुतोष राणा अशी स्टारकास्ट आहे.