मुंबई : सध्या सगळीकडेच लग्नाचे वारे वाहत आहेत. झी मराठीवरील मालिकांमध्ये देखील लग्नसराई पाहायला मिळत आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये गुरू शनायासोबत लग्न करणार आहे.
राधिका आणि शनायाची आई सुलक्षणा बाई यांचा विरोध असताना गुरू शनायासोबत पळून लग्न करण्याचा निर्णय घेतो. एका अज्ञात स्थळी जाऊन मंदिरात गुरू लग्न करतो.
या लग्नाचे फोटो शनाया म्हणजे अभिनेत्री ईशा केसकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आपल्याला माहितच आहे कलाकार मालिकेतील पात्र जगत असतात. प्रेक्षक देखील त्यांना त्यांच्या मालिकेतील भूमिकेतून जास्त ओळखत असतो.
असंच ईशाने गुरूने शनायाला घातलेल्या मंगळसूत्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे मंगळसूत्र हटके आहेत. हातात घालायचे हे मंगळसूत्र ट्रेंडी असून चाहत्यांच्या पसंतीला पडले आहे.
ईशाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अभिनेता ऋषी सक्सेनाने त्यावर खास कमेंट केली आहे. ईशा आणि ऋषी यांनी अनेकदा एकमेकांसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांच्यात खास नातं असल्याचं स्पष्ट झालं. पण अद्याप या दोघांनी कधीच आपल्या नात्याचा खुलासा केलेला नाही.
पण ईशाच्या रिल लाईफमधील लग्नाने अभिनेता आणि ईशाचा बॉयफ्रेंड ऋषीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. I am getting jealous अशी कमेंट त्याने ईशाच्या इंस्टा स्टेटसवर केली आहे. पुढे Maza Kai Honar असा सवाल देखील विचारला आहे.
ईशा आणि ऋषी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. चाहत्यांना हे अतिशय क्यूट कपल वाटतं. सतत एकमेकांचे फोटो हे दोघं सोशल मीडियावर शेअर करत असतात. किंवा एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात.