सलमान खानच्या आईला ही अभिनेत्री सून म्हणून पसंत

कोण आहे ही अभिनेत्री 

सलमान खानच्या आईला ही अभिनेत्री सून म्हणून पसंत

मुंबई : बॉलिवूडचा दबंग आणि टायगर म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता सलमान खान 52 वर्षांचा झाला आहे. आता सलमान खानचा लग्नाचा काहीच विचार नाही पण सलमानच्या आईला एक अभिनेत्री सून म्हणून अतिशय आवडली आहे. 

या अभिनेत्रीला सलमानची आई सून म्हणून करू इच्छिते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून कतरिना कैफ आहे. या गोष्टीचा खुलासा नुकताच झाला आहे. सलमान खानची आई आणि कतरिना कैफ या एकमेकींच्या खूप जवळ आहेत. दोघी अनेकदा एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. 

भारत सिनेमाच्या शुटिंगवेळी कतरिना कैफ आणि सलमानच्या आईचे अनेक फोटो समोर आले होते. यावेळी दोघी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढताना दिसत आहे. 

सलमान खानच्या लग्नाच्या चर्चा अनेकदा होत असते. चाहते देखील सलमान खानच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भाईजान कधी लग्न करणार? आणि कुणाशी लग्न करणार? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

अनेक कार्यक्रमात सलमानला लग्नाबाबत विचारणा केली जाते. तेव्हा तो मजेशीर काहीतरी उत्तर देऊन निघून जातो. या अगोदर एकदा लग्न म्हणजे पैशाची बर्बादी असं उत्तर देत सलमानने हा प्रश्न टाळला आहे.

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. त्याचं अफेअर ऐश्वर्या राय, यूलिया वंतूर, कतरिना कैफ सारख्या अभिनेत्रींसोबत होत. पण सलमानने कधीच या नात्यांची वाच्यता केली नाही.

कामाबद्दल बोलायचं झालं तर सलमान खान आगामी सिनेमा 'भारत'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफच असल्याचं म्हटलं आहे.