'काला चष्मा'नं जगावर गाजवलं अधिराज्य, गाणं लिहिणारं 15 वर्षाचा मुलगा आज करतोय 'हे' काम

जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती...

Updated: Sep 1, 2022, 06:13 PM IST
'काला चष्मा'नं जगावर गाजवलं अधिराज्य, गाणं लिहिणारं 15 वर्षाचा मुलगा आज करतोय 'हे' काम title=

मुंबई : सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक व्हिडीओ लगेच व्हायरल होताना दिसतात. काही गोष्टी तर अचानक ट्रेंडमध्ये येतात. सोशल मीडियावर बरेच लोक आपल्या लहाणपणीच्या मित्रांना देखील भेटतात.  असाच एक गाणं सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे. हे गाणं बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेलं हे गाणं एका 15 वर्षांच्या मुलानं लिहिलं होतं. 

आणखी वाचा : गणपती बाप्पानंही बनवलं आधार कार्ड! स्कॅन केल्यावर लगेच मिळणार दर्शन

'काला चष्मा' हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झालेल्या 'बार-बार देखो' या चित्रपटातील आहे. या गाण्याला जी म्यूजिक कंपनीनं बनवलं आहे. हे गाणं नेहा कक्कड आणि बादशाहनं गायलं आहे. 

आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या

पण हे गाणं सगळ्यात आधी 1991 मध्ये प्रदर्शित झालं होतं. हे गाणं गायक अमर अर्शीनं गायलं होतं. गाण्याला संगीत हे ढिल्लन यांनी दिलं. हे सगळे कलाकारा पंजाबी इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गाणं एका 15 वर्षाच्या मुलानं लिहिलं होतं. 

आणखी वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या अफेअरमुळे गोंधळ; ट्विंकलनं पतीकडून घेतलं 'हे' वचन

1991 मध्ये आलेल्या या गाण्याचे लिरिक्स अमरिक सिंग शेरा यांनं लिहिले आहेत. आता अमरिक पंजाब पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अमरिकनं नववीत असताना हे गाणं लिहिलं होतं. त्यानंतर त्यांनी यासाठी अनेक गायकांशी संपर्क साधला होता. त्यानंतर अर्शीने ते इंग्लंडमधील एका कार्यक्रमात गायलं. हे गाणं इंग्लंडमधील एका कंपनीनं अधिकृतरीत्या प्रदर्शित केलं हे गाणं चांगलचं लोकप्रिय ठरलं.

आणखी वाचा : सोनाली फोगाट लेकीसाठी सोडून गेल्या कोट्यवधीची संपत्ती, तिच्या जीवालाही धोका 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : तू आता Underwear घातलीयेस का? Karan Johar चा टायगरला विचित्र प्रश्न
इंग्लंडनंतर चंदीगडमधील एका कंपनीनेही हे गाणं पुन्हा प्रदर्शित केले. या गाण्यासाठी अमरिकला जवळपास 11 हजार रुपये मिळाले. हे गाणं एखाद्या चित्रपटात घेण्यात येईल याची कल्पना नाही. पंजाबमधील एका खेड्यातील मुलानं ते लिहिलं आहे. या गाण्याच्या लॉन्चच्या वेळी त्याला कोणीही मुंबईत बोलावले नाही, याची त्याला खंत आहे.