रितेश देशमुख याचे पहिले प्रेम जेनेलिया नाही तर...

 बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. मात्र, रितेश याचे पहिले प्रेम जेनेलिया (Genelia D'Souza) नाही, हे रितेशनेच सांगितले आहे. 

Updated: Jul 7, 2021, 12:29 PM IST
रितेश देशमुख याचे पहिले प्रेम जेनेलिया नाही तर...
Pic Courtesy: DNA

मुंबई : Riteish Deshmukh's first love : बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. (Riteish Genelia love story) त्यांचे बॉडिंगही चांगले आहे. अनेकवेळा दोघेही समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर करत असतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळेत. बऱ्याच वर्षांची मैत्री आणि त्यानंतर लग्न अशी त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांनाच माहितच आहे. या जोडीचा संसार गुण्यागोविदाने सुरु आहे. असे तरीही त्यांच्या प्रेमाची चर्चा नेहमी असते. आता नवीन चर्चा सुरु झाली आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचे पहिले प्रेम जेनेलिया (Genelia D'Souza) नाही, हे रितेशनेच सांगितले आहे. (Riteish Deshmukh's first love) त्यामुळे ही चर्चा आहे.

रितेश-जेनेलिया या जोडीकडे पाहिले की हे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत, असे कोणीही मान्य करेल. या दोघांची प्रेमकहाणीही रंजक आहे. एका सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा रितेश आणि जेनेलिया यांची ओळख झाली. मात्र दोघांमध्ये मैत्री होण्यास बराच कालावधी लागला.‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत रितेश याने जेनेलियासोबतच्या पहिल्या भेटीला उजाळा दिला. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशसोबत बोलतही नव्हती. रितेशचे वडील मुख्यमंत्री होते, म्हणून ती बोलण्यास कचरत होती, असे रितेशने स्पष्ट केले होते.

दरम्यान, जेव्हा हे दोघे बोलायला लागले, तेव्हा जेनेलिया हिने त्याला पहिला प्रश्न हाच विचारला की, तुझ्यासोबत सुरक्षारक्षक का नाहीत? हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री होऊ लागली आणि त्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. या दोघांचे ट्युनिंग पाहून कोणीही मान्य करेल, की जेनेलियाच रितेश देशमुखचे पहिले प्रेम आहे. मात्र, रितेशने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले. (Riteish Deshmukh's first love) त्याचे हे पहिले प्रेम जेनेलिया नाही तर फोटोग्राफी आहे. त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. मात्र सिनेमात पदार्पण केल्यानंतर रितेश आपल्या पहिल्या प्रेमाचा विसर पडला होता. जेनेलियानेच त्याला पुन्हा त्याचे प्रेम मिळवून दिले आहे. जेनेलियाने त्याला फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला देऊन न थांबता तिने त्याला एका कॅमेरा भेट दिला आणि आपल्या पतीचे हरवलेले प्रेम पुन्हा मिळवून दिले.

रितेश आणि जेनेलिया हे दोघे 2012 मध्ये विवाहबंधनात अडकलेत. त्यांना आता दोन छान मुले आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत आवडत्या कपल्समध्ये आजही या दोघांचे आघाडीने घेतले जाते.