मुंबई : कला जगतातील काही नाही, कायम चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय असतात. सध्या अशाच एका नात्याचा सुरेख प्रवास चाहत्यांच्या भेटीला येत आहे. पहिली भेट, प्रेमाची कबुली, प्रेम, रिलेशनशिप इथपासून लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडला जात आहे. पण, त्यातच म्हणे अभिनेत्रीला डेट करणं काही सोपं नाही, असं हा पठ्ठ्या म्हणाला आहे. तो असं का म्हणालाय हे एकदा पाहाच.
अभिनेत्री अमृता राव आणि आर.जे. अनमोल यांच्या प्रेमाच्या नात्याबद्दल कायम अनेकांना कुतूहल. (Amrita Rao, RJ Anmol )
'विवाह' या सुपरहिट चित्रपटानंतरच अमृता आणि अनमोल यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. त्यांच्या नात्याची कोणालाही कल्पनाच नव्हती. अमृतानं याबाबतचा खुलासा केला होता.
'आम्ही ही गोष्ट आई-वडिलांशिवाय इतक कोणालाही सांगितली नव्हती', असं अमृता म्हणाली. कारण, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असती.
दुसरीकडे आपण अमृताला डेट करतोय हे अनमोलला ओरडून ओरडून सांगायचं होतं. पण, त्यानं तसं केलं नाही.
अमृताशी नाव जोडलं जाण्यच्या चर्चांना उधाण येण्यापूर्वी ठरवल्याप्रमाणं अनमोलनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.
एका अभिनेत्रीला डेट करणं तितकंही सोपं नव्हंतं, हे अनमोल न विसरता सांगतो.
आपल्या या नात्यात अनमोलसा कधीच इर्ष्येच्या भावनेत अडकून पडल्याचं आपण पाहिलं नाही, असंही अमृता न विसरता सांगते.
पण, अमृता जेव्हा एखाद्या सेटवर असायची आणि ती आपल्या मेसेजला उत्तर नाही द्यायची तेव्हा मात्र मनात घालमेल व्हायची, असंही अनमोलनं सांगितलं.
सरतेशेवटी त्यानं आपल्या मनातील भीती तिला बोलून दाखवली, तो व्यक्त झाला आणि यावरही सोप्या मार्गानं तोडगा निघाला.
एका लोकप्रिय अभिनेत्रीला आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच डेट करणं, तिच्यावर नितांत प्रेम करणं आणि तिच्याशीच लग्नगाठ बांधून एका नव्या प्रवासाची सुरुवात करणं, असा अनमोलचा हा प्रवास.
मुख्य म्हणजे त्याच्या या प्रेमाच्या नात्याचा अनेकांनाच हेवा वाटतो, तितकंच कौतुकही वाटतं. अनमोल कितीही बोलत असला तरीही त्यानं खऱ्या अर्थानं प्रेमाचा हा शो सुपरहिट ठरवला असं म्हणायला हरकत नाही.