Golmaal 5 : रोहित शेट्टीने ‘गोलमाल 5’वर दिली मोठी अपडेट, म्हणाला लवकरच...

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने एका मुलाखतीत 'गोलमाल 5' चित्रपटाविषयी मोठं अपडेट दिले आहे. 'गोलमाल 5' हा चित्रपट कधी लोकांसमोर येणार हे त्याने सांगितले आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 24, 2024, 01:03 PM IST
Golmaal 5 : रोहित शेट्टीने ‘गोलमाल 5’वर दिली मोठी अपडेट, म्हणाला लवकरच... title=

Golmaal 5 : रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे. गोलमाल चित्रपटाचे चार भाग प्रदर्शित झाल्यानंतर आता लोक त्याच्या पाचव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा रोहित शेट्टीने या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटातील कलाकार बदलण्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.

एका मुलाखतीत रोहित शेट्टीला 'गोलमाल 5'बद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी रोहितने सांगितले की, गोलमाल 5 चित्रपटावर सध्या काम सुरू आहे. मात्र, सध्या या चित्रपटाला वेळ लागणार आहे. गोलमाल चित्रपटाची मालिका पुढे सुरुच राहणार आहे. चित्रपट बनणार नाही असे नाही. पण त्यासाठी काही वेळ लागेल. यावेळी रोहितने ही मालिका त्याच्या हृदयाच्या अगदी जवळची असल्याचे सांगितले आहे. मला याचा खूप अभिमान आहे. मग ती गोलमाल मालिका असो किंवा पोलिसांचे विश्व.

गोलमाल मालिका

रोहित शेट्टी म्हणाला की, गोलमाल चित्रपटातील मुख्य कलाकार कधीही बदलणार नाही. असा विचारही मी करू शकत नाही. हा चित्रपट येत्या 2 वर्षांत प्रदर्शित होईल. आधीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शेट्टीने 2006 मध्ये पहिल्यांदा 'गोलमाल: फन अनलिमिटेड' बनवला होता. या चित्रपटामध्ये अजय देवगन, अर्शद वारसी, तुषार कपूर, शर्मन जोशी, रिमी सेन आणि परेश रावल दिसले होते. यानंतर 2008 मध्ये त्याने 'गोलमाल रिटर्न्स' आणला. 

चाहत्यांना गोलमाल 5ची प्रतिक्षा

गोलमालच्या पहिल्या आणि दुसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.  2010 मध्ये 'गोलमाल 3' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर 2017 मध्ये रोहितने 7 वर्षानंतर चौथा चित्रपट आणला. 70 कोटी रुपयांच्या बजेटने 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. 'गोलमाल'चे सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले. आता चाहत्यांना त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

रोहितचे आगामी चित्रपट

'गोलमाल' रिलीज झाला आणि त्यानंतर रोहितने गोलमालचे आणखी तीन भाग रिलीज केले. सध्या चाहत्यांना त्याच्या गोलमाच 5 ची प्रतीक्षा आहे. सध्या रोहितचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. तर तो 27 जुलैपासून टीव्हीवर देखील दिसणार आहे. कारण लवकरच 'खतरों के खिलाडी 14' देखील सुरू होणार आहे. ज्याचे शूटिंग रोमानियामध्ये झाले आहे.