shooting करण्याआधी घाबरली आणि ढसाढसा रडायला लागली अभिनेत्री, पाहा काय घडलं

अभिनव शुल्का आणि रूबीनाची जोडी विशेष गाजली आजही ही जोडी कायम चर्चेत राहते.

Updated: Aug 1, 2022, 08:57 PM IST
shooting करण्याआधी घाबरली आणि ढसाढसा रडायला लागली अभिनेत्री, पाहा काय घडलं title=

Rubina Malik Fight: लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री रूबीना दिलीक हिने नुकत्याच सुरू झालेल्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये सहभाग घेतला आहे.याआधीही तिने बिग बॉस या शोमध्ये सहभाग दाखवला होता. आपल्या पतीसह म्हणजे अभिनव शुल्कासह तिने या रिएलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. अभिनव शुल्का आणि रूबीनाची जोडी विशेष गाजली आजही ही जोडी कायम चर्चेत राहते. 

रूबिना दिलीकने याआधी अनेक हिंदी टिव्ही सिरियल्समधून काम केलं आहे. त्यामुळे तिची ओळख ही जास्त करून सुसंस्कृत 'छोटी बहू' अशी प्रेक्षकांसमोर आहे. रूबिनाने खतरों के खिलाडीमध्ये सहभाग घेतला आहे. या शोमध्ये सध्या स्पर्धकांमध्ये बरीच भांडणं सुरू झाली आहेत. आता नुकतंच रूबीनाचे मोहित मलिकसोबत जोरात भांडणं झाल्याचे नुकत्याच रिलिज झालेल्या एका प्रोमोमधून दिसून आले आहे. 

शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये मोहितला एका टास्कसाठी काही साथीदार निवडायचे होते आणि मोहितने रुबीनाची निवड केली. हा टास्क सापांसोबतचा होता. ज्याची रुबिनाला खूप भीती वाटत होती म्हणून तिने हा टास्क करायला नकार दिला पण मोहितने मात्र यावर आक्षेप घेत रूबीना टास्कला नकार देण्याच्या बहाण्याने फक्त स्क्रिनवर झळकण्यासाठी नाटकं करते आहे अशी टिप्पणी केली आणि त्यावर रूबीनाला राग आला आणि ते दोघं या मुद्द्यावरून भांडायला लागले. 

मोहित मलिकसोबतच्या या भांडणानंतर रुबिना दिलीकला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि ती रडू लागली. कोणाचे तरी मन मोडणे चुकीचे आहे असं प्रत्यूत्तरही तिने मोहित केले. 

या भांडणाबाबत सोशल मीडियावर लोक रुबिनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. यासाठी लोक कमेंटमध्ये मोहित मलिकला खोटं ठरवत असून त्यांच्या म्हणण्यानुसार यावेळी शोमधील सहभागी सगळेच रुबिनाला मुद्दाम टार्गेट करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मोहितचे भांडणं यापुर्वी कनिका मानसोबत झाले होते. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.