close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बुमराहच्या फिरकीवर 'या' अभिनेत्रीची विकेट; ती म्हणते....

चर्चांना उधाण.... 

Updated: Jul 8, 2019, 08:43 AM IST
बुमराहच्या फिरकीवर 'या' अभिनेत्रीची विकेट; ती म्हणते....
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषकात दमदार कामगिरी करत आहे. संघाच्या या कामगिरीमध्ये एक खेळाडू सुरुवातीपासूनच त्याच्या अफलातून खेळामुळे चमकला. तो खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. 

'बूम बूम बुमराह....', म्हणून क्रीडारसिकांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या नावाची चर्चा क्रिकेट विश्वासोबतच कलाविश्वातही रंगण्यास सुरुवात झाली आहे. निमित्त आहे ते म्हणजे अर्थातच एका अभिनेत्रीला तो डेट करत असणाऱ्या अफवांचं. 

जसप्रीत दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करणाऱ्या या दोघांचा अंदाज पाहता त्यांच्या नात्यातील चर्चांना बरंच उधाण आलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे 'प्रेमम' फेम अनुपमा परमेश्वरन. अनुपमाही जसप्रीतला सोशल मीडियावर फॉलो करते त्यामुळे त्यांच्यात बहरणाऱ्या नात्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. परिणामी पुन्हा एकदा कला आणि क्रीडा विश्वाचं नातं आकर्षणाचा विषय ठरत आहे. 

अनुपमाने या सर्व चर्चांना पूर्णविराम देत जसप्रीत हा आपला चांगला मित्र असल्याचं स्पष्ट केलं. अनुपमाचं हे अपेक्षित उत्तर पाहता कोणालाही यात नवल वाटत नाही. पण, येत्या काळात या नात्याला नेमकं कोणतं वळण मिळणार का, हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 
 
 
 

A post shared by anupamaparameswaran (@anupamaparameswaran96) on

कोणा एका अभिनेत्रीशी नाव जोडलं जाण्याची बुमराहची ही पहिलीच वेळ नाही. मैदानावर विरोधी संघाच्या खेलाडूंना त्रिफळाचीत करणाऱ्या भारताच्या या गोलंदाजाच्या फिरकीने यापूर्वीही काहींची विकेट घेतल्याच्या चर्चा होत्या. पण, प्रत्येक वेळी या चर्चांना मैत्रीचाच पूर्णविराम दिला गेल्याचं पाहायला मिळालं. अनुपमासोबतच्या नात्याविषयी जसप्रीतकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही, सध्याच्या घडीला तो फक्त आणि फक्त क्रिकेट विश्वचषकातील कामगिरीवरच लक्ष केंद्रीत करत आहे.