सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Saba Azad and Hritik Roshan Vacation: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना ़डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता व्हेकेशनसाठी ते दोघं हे अर्जेनिटाला गेले आहेत. त्याचे फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायची एकही संधी सोडलेली नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 28, 2023, 04:49 PM IST
सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल title=
July 28, 2023 | saba azad and hritik roshan spends time with each other at argentina goes for vacation

Saba Azad and Hritik Roshan: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि सध्या ते आपला मोकळा वेळ एकत्र स्पेंड करताना दिसत आहेत. मध्यंतरी ते एकत्र लंडनला गेले होते. त्याचसोबत त्यांनी आपले हे फोटो एकत्र पोस्ट केल्यानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर झाले होते. त्यातून सध्या त्यांची चर्चा आहे ते पुन्हा एकदा फिरायला गेले आहेत आणि यावेळी ते चक्क अर्जेंटिना येथे गेले आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्याही वयात बरेच अंतर आहे. परंतु ते एकमेकांना डेट करत असल्यानं त्या दोघांना अनेकदा ट्रोल केले जाते. सबा आझाद ही वयानं फारच लहान असल्यानं तिला आणि हृतिकला पाहून कायमच नेटकरी ट्रोल करतात. खासकरून सबा त्यांच्यासमोर लहान मुलीप्रमाणे वाटते अशाप्रकारे त्या दोघांनाही ट्रोल केले जाते. हृतिक एका लहान मुलीला डेट करतो आहे अशाप्रकारे ते दोघं ट्रोल होताना दिसतात. 

सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या अर्जेंटिना येथील ट्रीपची. यावेळी सबानं आणि हृतिकनं आपले हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे त्यांची सध्या जोरात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्यामुळे ते आपला वेळ एकत्र घालवताना दिसत आहेत. परंतु नेटकरी मात्र त्यांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. त्यामुळे यावेळीही त्या दोघांना खासकरून सबा आझादला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं आहे. याआधी तुम्ही तेच तेच ऐकलं असेलच की सबा आझाद ही हृतिक रोशनच्या पुढे लहान मुलीसारखी वाटते. त्यातून हृतिक रोशन तर तिचा आजोबाचं वाटतो. त्यामुळे ते सतत ट्रोल होताना दिसत आहे. 

हेही वाचा - विनोद खन्नांसोबतच्या 'त्या' इंटिमेट सीनसाठी माधुरीनं घेतलं होतं तब्बल इतकं मानधन

यावेळी नेटकऱ्यांनी त्या दोघांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलंय की बहुतेक हृतिकला काळेभोर केस आणि गोऱ्या मुली आवडतात... जसे की कंगना, सुझॅन आता सबा... तर दुसऱ्या एका ट्रोलरनं लिहिलंय की, ''आई आणि बाबा'' तर तिसऱ्यानं लिहिलंय की, ''हा हृतिक तर पहिल्यांदाच म्हातारा वाटतोय'' तर अशाच एका ट्रोलरनं म्हणलंय की, ''आपल्या पत्नीला सोडून लहान मुलीसोबत फिरतोय हृतिक''. तर एकानं लिहिलंय की ''काय या सबाला नीट फोटोही घेता येत नाहीत?''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या त्यांच्या या फोटोंवर नानाविध कमेंट्स केल्या आहेत त्यामुळे सर्वचजण हे त्यांची खिल्ली उडवत आहेत. तुम्हाला माहिती का ते दोघं हे महागड्या हॉटेलमध्ये वेळ घालवता दिसत आहेत आणि मेस्सीच्या देशात ते दोघं पोहचले आहेत.