नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीज

Navra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 20, 2024, 05:24 PM IST
नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीज title=

Navra Maza Navsacha: नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने असंख्य मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट लहान मुलांबरोबरच मोठ्यांचाही आवडीचा चित्रपट आहे. आता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवरा माझा नवसाचा २ या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या सिनेमात एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यावेळी एसटीने नव्हे तर कोकण रेल्वेने प्रवास करुन नवस फेडला जाणार आहे. 

नवरा माझा नवसाच्या या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं आहे. तर, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमा इंगळे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले अशी मातब्बर कलाकारांची फौज असणार आहे. नवरा माझा नवसाच्या पहिल्या भागात आपण एसटीचा प्रवास अनुभवला मात्र, आता या प्रवासात ट्विस्ट असणार आहे. नवरा माझा नवसाचा भाग 2  मध्ये कोकण रेल्वेचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. तर, अशोक सराफ यावेळी बस कंडक्टर नव्हे तर टीसी म्हणून पेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 20 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टरही पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये एका ट्रेनच्या डब्यात अशोक सराफ, सचिन-सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमा इंगळे दिसत आहेत. तसंच, पोस्टमध्ये लिहलं आहे की, मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन नवरा माझा नवसाचा 2 ही नॉनस्टॉप कॉमेडी निघाली आहे गणपतीपुळ्याला निघाली आहे. पण यावेळेला एसटी नव्हे तर कोकण रेल्वेने. तुम्ही येताय ना हा प्रवास बघायला? सचिन पिळगावकर यांच्या पोस्टवर हजारो लाइक्स आले आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपट पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत. 

,

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x