सचिन पिळगांवकर यांनी लेकीसमोरच व्यक्त केली 'ती' खंत

Sachin  Pilgaonkar Shriya Pilgaonkar: सचिन पिळगांवकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सदाबहर अभिनेते आहे. वयाची 60 ओलांडली तरी ते अजूनही तितकेच फिट आणि फाईन दिसतात. त्याच्या फिटनेसही चर्चा होताना दिसते. परंतु सध्या त्यांनी एका गोष्टीवर आपली खंत व्यक्त केली आहे. नक्की काय म्हणाले? 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 2, 2023, 09:58 PM IST
सचिन पिळगांवकर यांनी लेकीसमोरच व्यक्त केली 'ती' खंत title=
फाईल फोटो

Sachin  Pilgaonkar Shriya Pilgaonkar: ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगावकर अनेकदा चर्चेत असतात. सचिन पिळगांवकर यांची 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही वेबसिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. सध्या या वेबसिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद येताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगली आहे. या सिरिजचा पहिला सिझन हा 2019 मध्ये आला होता तर दुसरा सिझन हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया ही देखील मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. तिनंही अनेक लोकप्रिय वेबसिरिजतून भुमिका निभावल्या होत्या. तिची मिर्झापूर ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. सोशल मीडियावर श्रियाही प्रचंड सक्रिय आहे सोबतच तिचे इन्टाग्रामवरही लाखो फॉलोवर्स आहे. 

सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांनी नुकतीच 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी एकत्रितपणे 'कोण होणार करोडपती'च्या हॉट सीटवर बसून सुत्रसंचालक सचिन खेडेकर यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचसोबतच त्यांनी यावेळी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. यावेळी त्यांनी मात्र एका गोष्टीविषयी खंत व्यक्त केली आहे. 'कोण होणार करोडपती' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. हा शो कधी आपल्या भेटीला येतो आहे याची उत्सुकता कायमच प्रेक्षकांना लागून राहिली असते. आता मात्र त्यांची उत्सुकता ही संपलेली आहे. येत्या भागात अभिनेते सचिन पिळगांवकर आपल्या लेकीसह उपस्थित राहणार आहेत. 

हेही वाचा - स्पॉटलाईट अलर्ट! 'टायटॅनिक'मधला जॅक नीलमच्या प्रेमात?

गेल्या 60 वर्षांपासून अभिनेते सचिन पिळगांवकर हे चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. बालकलाकार ते आता ओटीटीपर्यंत असा सचिन पिळगांवकर यांचा प्रवास आहे. परंतु यावेळी त्यांनी एका गोष्टींबद्दल मात्र खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ''माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. माझी खूप इच्छा होती, पण श्रियानं तिच्या कारकिर्दीची सुरूवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली''. असं ते यावेळी म्हणाले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगावंकर यांनी 'एकूलती एक' या मराठी चित्रपटातून भुमिका केली आहे. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सचिन पिळगांवकर यांनी केले होते. या चित्रपटातून श्रियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर श्रियानं मागे वळून पाहिले नाही. आतापर्यंत तिनं विविध विषयांवर चित्रपट केले आहेत. त्यामुळे तिच्या भुमिकाही बऱ्याच गाजल्या आहेत. सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकरही इन्टाग्रामवर सक्रिय असतात. त्यांचे फोटोही अनेकदा व्हायरल झाले.